आता अतिरिक्त पार्किंगची सक्ती

By Admin | Published: September 24, 2016 12:58 AM2016-09-24T00:58:06+5:302016-09-24T00:58:06+5:30

शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक पावले उचलली आहेत.

Now forcing extra parking | आता अतिरिक्त पार्किंगची सक्ती

आता अतिरिक्त पार्किंगची सक्ती

googlenewsNext

मॉल, हॉस्पिटलसह अपार्टमेंटमध्ये
व्हिजिटर्ससाठी पाच टक्के अतिरिक्त पार्किंग

नागपूर : शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक पावले उचलली आहेत. नगर विकास विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या नागपूर शहराच्या सुधारित विकास योजनेत पार्किंग स्थळांच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. यानुसार आता कोणतेही नवे बांधकाम करताना दुकान, शॉपिंग मॉल, हॉस्पिटल व निवासी अपार्टमेंटमध्येही आगंतुकासाठी (व्हिजिटर्स) अतिरिक्त पाच टक्के पार्किंगची व्यवस्था करावी लागेल. तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये नियमित पार्किंग व्यवस्थेसह आगंतुकांसाठी २० टक्के अतिरिक्त पार्किंगची व्यवस्था करावी लागणार आहे.
राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने २० सप्टेंबर २०१६ रोजी या संबंधीची अधिसूचना जारी केली आहे. यानुसार आता निवासी अपार्टमेंटमध्ये १५० वर्गमीटरहून अधिक क्षेत्रासाठी दोन कार, दोन स्कूटर, दोन सायकल (कन्झेस्टेड-नॉन कंन्झेस्टेड एरिया), १०० ते १४९ वर्ग मीटरसाठी एक कार, दोन स्कूटर, दोन सायकल पार्क करण्याची जागा राखीव असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या जागेशिवाय आगंतुकांसाठी ५ टक्के अतिरिक्त पार्किंगची व्यवस्था करावी लागेल.

बेसमेंटमध्ये पार्किंग आवश्यक
नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी आर.एस. चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेची प्रत महापालिका आयुक्त, नासुप्र सभापती, नागपूर विभागातील नगर रचना विभागचे विभागीय संयुक्त संचालक यांना पाठविण्यात आली आहे. अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रकाशित होताच तिची अंमलबजावणी केली जाईल. विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बदल तकीत इमारतीच्या तळ मजल्यावर (बेसमेंट) पार्किंगची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे. १००० वर्ग मीटरच्या भूखंडासाठी सिंगल बेसमेंट, १००१ ते २००० वर्ग मीटरच्या भूखंडासाठी टू टियर बेसमेंट, २००१ वर्गमीटरपेक्षा मोठ्या भूखंडासाठी थ्री टियर बेसमेंटची परवानगी दिली जाईल.
विशेष म्हणजे पार्किंगसाठी बेसमेंट तयार करताना त्याची क्षमता फायर इंजिनिअरिंगच्या माध्यमातून तपासणे आवश्यक असेल. एखादी इमारत बहुपयोगी असेल तर त्या इमारतीच्या बेसमेंटच्या सभोवताल सुरक्षा भिंत बांधता येणार नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Now forcing extra parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.