आता लॉनमध्ये २०० लोकांत करा लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:12 AM2021-08-13T04:12:46+5:302021-08-13T04:12:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ब्रेक द चेनअंतर्गत जिल्हा प्रशासनानेही गुरुवारी कोविड प्रोटोकॉलसंदर्भात नवे दिशा-निर्देश जारी केले आहेत. येत्या ...

Now get married to 200 people on the lawn | आता लॉनमध्ये २०० लोकांत करा लग्न

आता लॉनमध्ये २०० लोकांत करा लग्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ब्रेक द चेनअंतर्गत जिल्हा प्रशासनानेही गुरुवारी कोविड प्रोटोकॉलसंदर्भात नवे दिशा-निर्देश जारी केले आहेत. येत्या १५ ऑगस्टपासून लागू होणाऱ्या या निर्देशांतर्गत लग्नसमारंभाच्या आयाेजनात काहीसा दिलासा मिळाला आहे. आता मंगल कार्यालयात लग्नसमारंभ असेल तर क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १०० लोकांना परवानगी राहील, तर लॉनमध्ये होणाऱ्या लग्नात २०० लोक उपस्थित राहू शकतील.

जिल्हाधिकारी विमला आर. यांनी जारी केलेल्या या आदेशात दुकान, शॉपिंग मॉल, रेस्टाॅरंट आता सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तसेच सामाजिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनासुद्धा रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. परंतु यात सभागृहातील क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १०० लोक अशी अट राहील.

इंडोर व आउटडोर खेळांनाही हिरवी झेंडी मिळाली आहे. अंत्यविधीमध्ये आता २० ऐवजी ५० लोक सहभागी होऊ शकतील. त्याचप्रकारे मनोरंजन पार्क व बोटिंगही नियमित करण्यात आली आहे. व्यायामशाळा, सलून, ब्यूटिपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर व योगा सेंटर ५० टक्के क्षमतेसह रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येेतील. धार्मिक स्थळ, स्वीमिंग पूल व कोचिंग क्लासेस मात्र बंदच राहतील. शाळा-महाविद्यालयांबाबत राज्य सरकारच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल.

Web Title: Now get married to 200 people on the lawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.