आता ‘कोरोना’वरच ‘कर्फ्यू’ लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 10:32 AM2020-07-27T10:32:34+5:302020-07-27T10:32:59+5:30

आपल्याला कोरोनावर ‘कर्फ्यू’ लावायचा आहे आणि स्वत:ला अनलॉक करायचे आहे. त्यासाठी नियमांचे बंधन स्वत:वर ठेवावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

Now impose curfew on Corona | आता ‘कोरोना’वरच ‘कर्फ्यू’ लावा

आता ‘कोरोना’वरच ‘कर्फ्यू’ लावा

Next
ठळक मुद्देनियम आणि दिशानिर्देश पाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने नागरिकांनी आपण मनात आणले तर काहीही करू शकतात. हे दाखवून दिले आहे. याच पद्धतीची जीवनशैली भविष्यात प्रत्येकाने अमलात आणावी. आपल्याला कोरोनावर ‘कर्फ्यू’ लावायचा आहे आणि स्वत:ला अनलॉक करायचे आहे. त्यासाठी नियमांचे बंधन स्वत:वर ठेवावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरात पुन्हा लॉकडाऊन करावे की नाही यावर मत-मतांतरे सुरू आहेत. दरम्यान, दोन दिवस जनता कर्फ्यूची संकल्पना समोर आली. नागपूरकरांनी या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र या दोन दिवसानंतर नागरिकांनी पुन्हा गर्दी करु नये. जे नियम कोविड-१९ चे संक्रमण थांबविण्याच्या दृष्टीने आखून देण्यात आले आहेत, त्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन व्हावे. चेहऱ्यावर मास्क, दुकानात पाचपेक्षा अधिक व्यक्ती असू नये. फिजिकल अंतराचे पालन व्हावे, याची काळजी दुकानदारांनी घ्यायला हवी. प्रत्येक दुकानात सॅनिटायझरची व्यवस्था असायलाच हवी. सम-विषम नियमाचे पालन, सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेतच दुकाने उघडी असायला हवी.

दुचाकीवर एका व्यक्तीपेक्षा अधिक व्यक्ती असू नये. चार चाकीमध्ये टू प्लस वन हा नियम पाळायला हवा. विनाकारण घराबाहेर पडू नये. नको तेथे गर्दी करु नये, हे नियम पाळले तर लॉकडाऊनची गरज मुळीच पडणार नाही. नियमांचे पालन करूनच कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे, असेही तुकाराम मुंढे म्हणाले.

दंड वसुली हा हेतू नाही
मास्क न वापरणे, दुकानांसंदर्भात असलेल्या नियमांचे उल्लंघन करणे यासाठी दंड आकारण्यात येतो. या दंडाची रक्कमही वाढविण्यात आली आहे. दंड वसूल करणे हा मनपाचा उद्देश नाही. नियमांचे पालन सक्तीने व्हावे, ही त्यामागील भूमिका आहे.
 

 

Web Title: Now impose curfew on Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.