नाऊ इंडिया इज नंबर वन

By admin | Published: September 27, 2014 02:40 AM2014-09-27T02:40:12+5:302014-09-27T02:40:12+5:30

आतापर्यंत भारताचा तिसऱ्या, चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर उल्लेख केला जात होता. मंगळ मोहीम यशस्वी झाल्यामुळे भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

Now India is number one | नाऊ इंडिया इज नंबर वन

नाऊ इंडिया इज नंबर वन

Next

नागपूर : आतापर्यंत भारताचा तिसऱ्या, चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर उल्लेख केला जात होता. मंगळ मोहीम यशस्वी झाल्यामुळे भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे. ‘नाऊ इंडिया इज नंबर वन’ अशा भावना माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी व्यक्त केल्या.
विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) नागपूरतर्फे आयोजित ‘अ‍ॅक्सिस-२०१४’ वार्षिक तांत्रिक प्रदर्शनाचे आज, शुक्रवारी कलाम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष विश्राम जामदार, संचालक नरेंद्र चौधरी, प्रदर्शनाचे प्रभारी डॉ. यशवंत काटपाताळ व डॉ. जे. पी. सिंग व्यासपीठावर उपस्थित होते.
व्हीएनआयटी परिसरातील हिरवळ पाहून कलाम प्रभावित झाले. वातावरणातील कार्बनडाय आॅक्साईड कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने वृक्ष संवर्धनाचा पण केल्यास एक सुंदर भारत घडविता येईल, असे ते म्हणाले. आपण अनेक अचंबित करणारे वैज्ञानिक शोध लावले. त्या-त्या वैज्ञानिकांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून तुम्ही स्वत:लाच विचारा की आपण काय मिळविले. अविष्कार घडविण्यासाठी समर्पणाची भावना, आत्मविश्वास व परिश्रम आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला हवे ते प्राप्त करता येईल, असे सांगून कलाम यांनी ‘आय विल फ्लाय’ कविता ऐकविली.
जीवनात नेहमीच समस्या येत असतात. समस्यांना स्वत:वर हावी होऊ देऊ नका. तंत्रज्ञानात अपयश येतच असते. समस्यांवर मात करा. यशस्वी होण्यासाठी हे आवश्यक आहे. कोणत्याही एका क्षेत्राची निवड करून नवनवीन शोध लावा, असे आवाहन कलाम यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Now India is number one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.