आता वस्ती व गावातही ग्राहक पंचायती : गजानन पांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:20 PM2018-10-02T18:20:15+5:302018-10-02T18:21:57+5:30
प्रत्येक वस्ती व गावात ग्राहक पंचायतची शाखा स्थापन करण्याचे आवाहन अ.भा. ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी रामदासपेठ येथील प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्येक वस्ती व गावात ग्राहक पंचायतची शाखा स्थापन करण्याचे आवाहन अ.भा. ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी रामदासपेठ येथील प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत केले.
यावेळी पांडे यांनी नागपूर जिल्हा व नागपूर महानगर कार्यकारिणी जाहीर केली. केंद्रीय कार्यकारिणी सदस्या अॅड. गौरी चांद्रायण व्यासपीठावर उपस्थित होते. अ.भा. ग्राहक पंचायतच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची परिषद ६ व ७ आॅक्टोबरला नागपुरात होत आहे. संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
नवीन कार्यकारिणीत जिल्हा संघटनमंत्री गणेश शिरोळे, जिल्हाध्यक्ष प्रवीण शर्मा, उपाध्यक्ष दत्तात्रय कठाळे, घनश्याम रहाटे, बब्बुभाई शेख, उमाकांत मर्जिवे, सचिव नरेंद्र कुळकर्णी, सहसचिव सुरेश रोहणकर, ज्ञानेश्वर चौधरी, कोषाध्यक्ष श्रीपाद हरदास, महिला प्रमुख योगिता बैतुले, सहमहिला प्रमुख प्रीती कोहाड, सोनाली बागडदे, प्रसिद्धी प्रमुख केशव पानतावणे, सहप्रसिद्धी प्रमुख सुभाष राऊत, प्रवासी प्रमुख गजेंद्र दरक, विधी सल्लागार अॅड. विलास भोसकर, सहसंपर्क प्रमुख अविनाश बागडदे, कार्यकारिणी सदस्य मनोज झाडे, नामदेव आमनेरकर, प्रशांत पाचपोहर, प्रशांत अर्डक, विलास ठाकरे, अनिल तंबाखे, वंदना देशमुख, प्रकाश भुजाडे, दीपक उपाध्ये, रमेश इंगोले, विजय बालपांडे, शरद मिरे, डॉ. संतोष राऊत, नंदकिशोर काळे, भागवत भिसे, विजय पांडे, प्रकाश येळणे, डॉ. कश्यप, मनोहर ढोले, नरेश उराडे, धनराज पखाले, विलास ठोसर यांचा समावेश आहे.
नागपूर महानगर कार्यकारिणीत संघटनमंत्री संजय धर्माधिकारी, अध्यक्ष अनिरुद्ध गुप्ते, उपाध्यक्ष चंद्रशेखर ढवळे, हरीश नायडू, डॉ. राजेंद्र गुंडलवार, डॉ. अरविंद हरणे, सचिव उदय दिवे, सहसचिव- अरविंद हाडे, जीवन झाडे, राजू पुसदेकर, विधी सचिव अॅड. विलास भोसकर, कोषाध्यक्ष श्रीपाद हरदास, महिला प्रमुख तृप्ती आकांत, सहमहिला प्रमुख उषा देव, नयना देशपांडे, कार्यकारिणी सदस्यांमध्ये संजय चिंचमलातपुरे दक्षिण नागपूर, हरिभाऊ चौधरी पूर्व नागपूर, धनंजय वरदळकर पश्चिम नागपूर, मुकेश गजभिये उत्तर नागपूर यांचा समावेश आहे.