आता बिलावरील मीटरच्या रिडींगची फोटोपद्धत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:24 PM2019-01-19T23:24:21+5:302019-01-19T23:25:02+5:30

महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महावितरणने १ फेब्रुवारी २०१९ पासून वीजबिलावरील मीटररिडींगचा फोटो देण्याची पध्दत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Now meter reading photo on the bill is closed | आता बिलावरील मीटरच्या रिडींगची फोटोपद्धत बंद

आता बिलावरील मीटरच्या रिडींगची फोटोपद्धत बंद

googlenewsNext
ठळक मुद्देवीजग्राहकांना मोबाईलवरच मीटर रिडींगची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महावितरणने १ फेब्रुवारी २०१९ पासून वीजबिलावरील मीटररिडींगचा फोटो देण्याची पध्दत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
वीज ग्राहकांना वीज मीटरच्या रिडींगची अचूक माहिती मिळावी म्हणून देशात महावितरणने सर्वप्रथम वीज बिलावर मीटर रिडींगचा फोटो छापण्याची पध्दत सुरू केली होती. या निर्णयाचा ग्राहकांना मोठा फायदाही होत होता. मात्र यात बिल तयार झाल्यानंतर ग्राहकांना मीटरच्या रिडींगचा फोटो उपलब्ध होत होता. परंतु आता महावितरणकडून ज्या ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे, अशा ग्राहकांना महावितरणसंबंधीच्या विविध सेवांची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे दिली जाते. त्यामुळे मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीज बिल मिळण्यापूर्वीच मीटर रिडींग घेताच त्याची माहिती तात्काळ उपलब्ध करून दिली जाते. परिणामी ग्राहकांना आपले मीटर रिडींग पडताळणीसाठी उपलब्ध राहील. तसेच मीटर रिडींगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्री क्रमांक अथवा नजिकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरुस्त करता येणे शक्य होईल.
फोटो मीटर रिडींग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरीही ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्राहकांना चालू महिन्यातील मीटरचा फोटो पाहण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच मीटरचा फोटो न छापल्यामुळे रिक्त राहणाऱ्या जागेवर ग्राहकांना वीजबिलासंबंधी पूरक माहिती देण्यात येईल.
सर्व वर्गवारीतील सुमारे दोन कोटी सात लाखापेक्षा अधिक वीज ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केलेली आहे. उर्वरित वीजग्राहकांनीही महावितरणच्या वीजसेवेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
येथे करा मोबाईलची नोंदणी
महावितरणच्या ९२२५५९२२५५ या क्रमांकावर 'एसएमएस'द्वारे वीजग्राहकांना स्वत:च्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून ९२२५५९२२५५ क्रमांकावर  'एसएमएस' केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय २४ बाय ७ सुरु असणाऱ्या कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

 

Web Title: Now meter reading photo on the bill is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.