आता एसएमएसद्वारेही मीटर रीडिंग पाठविता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:07 AM2021-05-01T04:07:54+5:302021-05-01T04:07:54+5:30
नागपूर : महावितरणने मोबाइल अॅप व वेबसाइटद्वारे वीज ग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर आता मोबाइल ...
नागपूर : महावितरणने मोबाइल अॅप व वेबसाइटद्वारे वीज ग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर आता मोबाइल ‘एसएमएस’द्वारेदेखील मीटर रीडिंग पाठविण्याची खास सोय उपलब्ध करून दिली आहे.
प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रीडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीज बिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांकदेखील नमूद आहे. रीडिंगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवसाआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाइल अॅप किंवा वेबसाइटद्वारे रीडिंग पाठविता येईल. सोबतच या चार दिवसांमध्ये आता मोबाइल एसएमएसद्वारेदेखील मीटर रीडिंग पाठविता येणार आहे.