आता मला कोणताही माइकालाल मैदानात रोखू शकणार नाही; अनिल देशमुखांचे ईडी कारवाईवरून आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 07:59 PM2023-04-16T19:59:50+5:302023-04-16T20:00:29+5:30

Vajramuth Sabha in Nagpur: या सभेमध्ये ईडीच्या कारवाईतून दिलासा मिळालेले एनसीपीचे नेते आणि राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीवर शरसंधान साधले आहे.

Now nobady can stop me in the field; Anil Deshmukh's challenge to ED, BJP in Nagpur's Vajramuth Ralley NCP, Shivsena, Congress | आता मला कोणताही माइकालाल मैदानात रोखू शकणार नाही; अनिल देशमुखांचे ईडी कारवाईवरून आव्हान

आता मला कोणताही माइकालाल मैदानात रोखू शकणार नाही; अनिल देशमुखांचे ईडी कारवाईवरून आव्हान

googlenewsNext

मविआची आज नागपुरमध्ये वज्रमुठ सभा होत आहे. संभाजीनगरमध्ये पहिली सभा झाली होती. या सभेमध्ये ईडीच्या कारवाईतून दिलासा मिळालेले एनसीपीचे नेते आणि राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीवर शरसंधान साधले आहे. ईडीला काहीही पुरावे मिळलेले नाहीत. ज्या माणसाने माझ्याविरोधात तक्रार केलेली तो सहा महिने परदेशात फरार झालेला, असे देशमुख म्हणाले. 

या सभेला मविआचे सर्व वरिष्ठ नेते हजर आहेत. ईडीला काहीही पुरावे मिळलेले नाहीत. ज्या माणसाने माझ्याविरोधात तक्रार केलेली त्याला कोर्टाने हजर राहण्यास सांगितले होते. तो  न्यायालयात आलाच नाही. परदेशात सहा महिने फरार होता. परमबीर सिंगांना दबाव टाकून माझ्याविरोधात उभे करण्यात आले. वर्षभर मला आत टाकलेले. कोर्टात जेव्हा हे प्रकरण गेले तेव्हा कोर्टाने त्यांची कागदपत्रे पाहिली. त्यात काहीच सापडले नाही. कोर्टाने हे सर्व आरोप ऐकीव आहेत, असे सांगितले. मग ईडीने एक कोटी ७१ लाखांचा ठपका ठेवला, त्यावरही कोर्टाने पुरावे मागितले परंतू ते देखील दिले नाहीत, असा आरोप देशमुख यांनी केला. 

आता मला कोणताही माइकालाल मैदानात येण्यापासून थोपवू शकणार नाही, असे आव्हान माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिले. आजच्या मविआच्या सभेला विरोध करण्याचा काहींनी प्रयत्न केला. संभाजीनगरची विराट सभा पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. यामुळे ते विरोध करत होते, असा आरोपही देशमुख यांनी केला. 
शेतकरी अडचणीत आहे. अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली. पंचनामे झाले परंतू ज्या पद्धतीने मदत व्हायला हवी तशी सरकारकडून झालेली नाही. संत्रा मोसंबीचे सात आठ महिन्यांपूर्वी नुकसान झाले होते. रिपोर्ट जाऊनही आतापर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. विधानसभेत दीड महिन्यांपूर्वी फडणवीसांनी लवकरच देऊ असे सांगितले होते. परंतू आजवर मदत मिळालेली नाही, असा आरोप देशमुख यांनी केला. 

कापसाचे भाव कर रद्द केल्याने पडले. निर्यात परदेशात केली गेली नाही, यामुळे देखील दर पडले. शेतकरी अडचणीत असताना बँकांच्या माध्यमातून कर्ज घेतलेले, परंतू परतफेड करू शकलेले नाही. त्यांच्या शेताचे लिलाव काढण्यात आले आहेत, यावर देखील सरकारने निर्णय घेतलेला नाही, असा आरोप देशमुख यांनी केला. 

Web Title: Now nobady can stop me in the field; Anil Deshmukh's challenge to ED, BJP in Nagpur's Vajramuth Ralley NCP, Shivsena, Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.