आता वन्य प्राण्यांमध्येही संक्रमणाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 01:06 PM2021-05-03T13:06:25+5:302021-05-03T13:06:42+5:30
Nagpur News देशभरात वाढत असलेल्या कोरोना संक्रमणानंतर आता वन्य जीवांमध्येही संक्रमणाचा धोका व्यक्य होत आहे. यामुळे वन्यजीव प्राधिकरणाने चिंता व्यक्त केली आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्राधिकरणाने सर्व प्राणिसंग्रहालयांसाठी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरात वाढत असलेल्या कोरोना संक्रमणानंतर आता वन्य जीवांमध्येही संक्रमणाचा धोका व्यक्य होत आहे. यामुळे वन्यजीव प्राधिकरणाने चिंता व्यक्त केली आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्राधिकरणाने सर्व प्राणिसंग्रहालयांसाठी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. उपराजधानी नागपुरातील महाराजबाग प्राणिसंग्रहालयालादेखील या सूचना प्राप्त झाल्या आहेत.
पिंजऱ्यात असलेल्या जनावरांना संक्रमणाचा धोका असल्याने त्यांच्या पिंजऱ्याभोवती आणि परिसरात कीटकनाशक औषधांसह सॅनिटायझेशन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना संक्रमण वाढल्याने सध्या सर्व प्राणिसंग्रहालये पर्यटकांसाठी बंद आहेत. जनावरांच्या अन्नासंदर्भात दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषत: मांसाहारी प्राण्यांच्या भोजनासंदर्भात अतिदक्षता घेण्याच्या सूचना असून दिले जाणारे भोजन कोरोना संक्रमित नसल्याची खात्री करण्याच्या सूचना आहेत. प्राण्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे, त्याच्या नोंदी ठेवणे, प्राण्यांमध्ये असामान्य लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी आणि उपचार करणे अशा सूचना आहेत.
मागील वर्षी अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयातील सिहांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभारतील प्राणिसंग्रहालयांना अतिदक्षतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे या वेळी प्राण्यांचा देखभालीकडे प्राधिकारण गांभीर्याने लक्ष देत आहे.
महाराजबागेत प्रारंभापासूनच पर्यटकांसाठी प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. मात्र स्टाफ अपुरा असल्याने सर्वांनाच यावे लागले. शाकाहारी-मांसाहारी प्राण्यांच्या खानपानाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जात आहे. पिंजऱ्यांच्या आजूबाजूला सॅनिटायजेशन केले जात आहे. शाकाहारी प्राण्यांच्या भोजनाकडेही कटाक्षाने लक्ष पुरविले जात आहे.
- सुनील बावस्कर, प्राधिकारी, महाराजबाग प्राणिसंग्रहालय
...