आता ग्रामपंचायत सदस्य ठरविणार सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:25 AM2020-12-13T04:25:50+5:302020-12-13T04:25:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : यापूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेने मतदान करीत सरपंच निवडण्याची प्रक्रिया होती. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ...

Now the Sarpanch will decide the Gram Panchayat member | आता ग्रामपंचायत सदस्य ठरविणार सरपंच

आता ग्रामपंचायत सदस्य ठरविणार सरपंच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : यापूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेने मतदान करीत सरपंच निवडण्याची प्रक्रिया होती. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदर ‘फॉर्म्युला’ बदलविण्यात आला असून, आता ग्रामपंचायत सदस्यच सरपंच ठरविणार आहेत. उमरेड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार असून राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.

१५ जानेवारी रोजी होत असलेल्या या निवडणुकीचे नियोजन आखले जात असून, प्रशासनसुद्धा सज्ज झाले आहे. तालुक्यातील चनोडा, बोरगाव (लांबट), खुर्सापार (बेला), सालईरानी, खैरी (चारगाव), कळमना (बेला), शेडेश्वर, किन्हाळा, सावंगी (खुर्द), खुर्सापार (उमरेड), शिरपूर, विरली, मटकाझरी आणि नवेगाव साधू याठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानंतर ठिकठिकाणी गुलाबी थंडीत राजकीय पारा चढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Now the Sarpanch will decide the Gram Panchayat member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.