नागपुरात ब्युटी पार्लरमध्ये आता मटक्याचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:48 AM2018-10-12T00:48:48+5:302018-10-12T00:50:30+5:30

ब्युटी पार्लरच्या नावाखाली मटक्याचा अड्डा चालवित असलेल्या महिलेला पाचपावली पोलिसांनी पकडले. पाच महिन्याच्या आत या महिलेस दुसऱ्यांदा पकडण्यात आले.

Now the satta den in Nagpur beauty parlor | नागपुरात ब्युटी पार्लरमध्ये आता मटक्याचा अड्डा

नागपुरात ब्युटी पार्लरमध्ये आता मटक्याचा अड्डा

Next
ठळक मुद्देकमाल चौकात कारवाई : आरोपी महिलेस अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्युटी पार्लरच्या नावाखाली मटक्याचा अड्डा चालवित असलेल्या महिलेला पाचपावली पोलिसांनी पकडले. पाच महिन्याच्या आत या महिलेस दुसऱ्यांदा पकडण्यात आले. सुनिता चंदन खत्री रा. कपिलनगर, जरिपटका असे आरोपी महिलेचे नाव आहे.
सुनिताचे कमाल चौकात सखी ब्युटी पार्लर आहे. पोलीस सूत्रानुसार सुनिता अनेक दिवसापासून ब्युटी पार्लरच्या नावाखाली मटक्याचा अड्डा चालवत आहे. परिसरातील लोकांनाही याची माहिती आहे. पाच महिन्यांपूर्वी परिसरातील नागरिकांनी नियंत्रण कक्षाला याबाबत सूचना दिली होती. नियंत्रण कक्षाच्या सूचनेवरून पाचपावली पोलिसांनी धाड टाकून सुनिताला पकडले होते. तिला लगेच जामीनही मिळाला होता. यानंतर सुनिता पुन्हा मटक्याचा अड्डा चालवू लागली. नागरिकांनी पुन्हा पोलिसात तक्रार केली. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी सुनिताच्या पार्लरवर धाड टाकली. तेथून मटक्याची पट्टी, आणि रुपये जप्त करण्यात आले.
सूत्रानुसार सुनिताच्या पार्लरमध्ये पुरुषांची ये-जा अधिक असल्याने परिसरातील नागरिकांना येथे अवैध धंदा चालत असल्याचा संशय होता. त्यामुळे नागरिक वारंवार पोलिसांना सूचना देत होते. सुनिता मोबाईलवर मटक्याची खायवडी करीत होती. तिचा पती जनरल स्टोअर्स चालवतो. ब्युटी पार्लर चालत नसल्याने आर्थिक तंगीमुळे मटका चालवत असल्याचे तिने सांगितले.

Web Title: Now the satta den in Nagpur beauty parlor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.