आता गडचिरोलीसाठीही शिवशाही बसची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 08:48 PM2018-04-12T20:48:33+5:302018-04-12T20:48:42+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकत नागपूर-गडचिरोली-नागपूर शिवशाही बसची सेवा १० एप्रिलपासून सुरु केली आहे.

Now the services of Shivshahi bus for Gadchiroli | आता गडचिरोलीसाठीही शिवशाही बसची सेवा

आता गडचिरोलीसाठीही शिवशाही बसची सेवा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवाशांनी या वातानुकुलित बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकत नागपूर-गडचिरोली-नागपूर शिवशाही बसची सेवा १० एप्रिलपासून सुरु केली आहे. ही बस नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकावरून सकाळी ५.४५, ६.३०, दुपारी २.३०, ३ वाजता सुटेल. गडचिरोलीवरून ही बस सकाळी १०.१५, ११, सायंकाळी ६.३०, ७ वाजता राहील. या बसचा मार्ग नागपूर, उमरेड, नागभीड, ब्रह्मपुरी, आरमोरी, गडचिरोली असा राहणार आहे. सदर शिवशाही बस वातानुकुलित असून आकर्षक डिजिटल बोर्ड, पुशबॅक आरामदायक सिट, २ बाय २ आसन व्यवस्था मोबाईल चार्जरसह, सीसीटीव्ही कॅमेरा, उद्घोषणा प्रणाली असून बसण्याची क्षमता ४५ आहे. प्रवाशांनी या वातानुकुलित बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.

Web Title: Now the services of Shivshahi bus for Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.