आता रेल्वेतील तांत्रिक दोष तातडीने शोधले जाणार, ओएचई पॅरामीटर मापन गेज लाँच
By नरेश डोंगरे | Published: September 24, 2023 02:11 PM2023-09-24T14:11:05+5:302023-09-24T14:11:27+5:30
या उपकरणामुळे निर्माण होणारे तांत्रिक दोष तातडीने शोधले जाईल आणि रेल्वेसेवेत येणारा व्यत्यय टाळला जाणार आहे.
नागपूर : ऐनवेळी निर्माण होणारे तांत्रिक दोष आणि ते लवकर शोधले जात नसल्याने रेल्वे वाहतूक सेवेवर होणारा परिणाम लक्षात घेत मध्य रेल्वेने आता ओव्हरहेड ईक्विपमेंट (ओएचई) उपकरण सेवेत आणले आहे. या उपकरणामुळे निर्माण होणारे तांत्रिक दोष तातडीने शोधले जाईल आणि रेल्वेसेवेत येणारा व्यत्यय टाळला जाणार आहे.
क्रॉसओव्हर्स आणि टर्नआउट्सच्या मानक पॅरामीटर्समधील विचलनांमुळे अनेकदा पॅन्टोग्राफ अडकून पडतात. त्यामुळे वाहतूकीत व्यत्यय निर्माण होतो. त्याचा परिणाम रेल्वेची यंत्रणा आणि प्रवासी या दोहोंवर होतो. मुंबई सारख्या भारतातील सर्वात व्यस्त विभागात यामुळे फारच धावपळ होते. या नवीन उपकरणामुळे दोष टाळण्यासाठी आणि दोष शोधण्यासाठी कॉन्टॅक्टलेस लेसर-आधारित तंत्रज्ञानाचा लाभ मिळतो. यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हे उपकरण वापरणारा कर्मचारी, अधिकारी आपल्या मोबाइल ऍप्लिकेशनद्वारे आता थेट लाईन चेकिंग आणि त्यासंबंधीची देखरेख करू शकतात.
नवीन ओएचईची वैशिष्ट्ये
जलद, सुरक्षित आणि अचूक दोष मापन. वेगवान चाचणी, फक्त ५ ते १० मिनिटात चाचणी होते. मणूष्यबळ खूपच कमी लागते. कारण हलके आणि हाताळण्यास सोपे असल्यामुळे एक किंवा दोन कर्मचारीच या माध्यमातून सर्वत्र नजर ठेवू शकतात. या शिवायही या उपकरणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत.