आता विजेचे पेण्डिंग बिल भरण्यासाठी किश्तीची सुविधा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:09 AM2021-09-03T04:09:21+5:302021-09-03T04:09:21+5:30
- नागरिकांना कार्यालयातून पळवून लावत आहेत महावितरणचे अधिकारी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे ...
- नागरिकांना कार्यालयातून पळवून लावत आहेत महावितरणचे अधिकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे राज्य सरकारच्या निर्देशानुसार महावितरणने विजेचे पेण्डिंग बिल भरण्यासाठी किश्त पाडण्याच्या सुविधेची घोषणा केली होती; परंतु ही सुविधा काहीच महिन्यात समाप्त करण्यात आली आहे. किस्त पाडण्यासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना परत पाठविले जात आहे. बिलाची पूर्ण रक्कम भरा अन्यथा विजेची जोडणी कापली जाईल, अशी धमकीच अभियंते देत आहेत. विचारपूस केल्यावर कंपनीने अधिकारीक स्वरूपात ही सुविधा समाप्त केल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे वीज बिलाची शिल्लक वाढत असल्याने महावितरणने वसुली मोहिमेस सुरुवात केली आहे. शिल्लक रक्कम भरली नसल्याच्या कारणाने गेल्या महिन्यात दहा हजारावर विद्युत जोडण्या कापण्यात आल्या आहेत. दरम्यान, मोठ्या संख्येने ग्राहक वीज बिल भरण्यासाठी किस्त पाडण्याच्या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयात पोहोचत आहेत. ते कनिष्ठ अभियंत्यापासून ते कार्यकारी अभियंत्यांपर्यंत भेटत आहेत; मात्र किस्त पाडून देण्यास अधिकारी वर्ग स्पष्ट नकार कळवत आहे. पूर्ण बिल एकाच वेळी भरा, अन्यथा वीज जोडणी कापली जाईल, असा इशारा दिला जात आहे. ग्राहक अधिकाऱ्यांना आपल्या अडचणी सांगत आहेत; मात्र त्याचा कोणताही परिणाम अधिकाऱ्यांवर पडताना दिसत नाही.
महावितरणच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अधिकारीक स्वरूपात किस्त पाडून देण्याची योजना आता समाप्त करण्यात आली आहे. काही प्रकरणांत कंपनीचे अधिकारी आपल्या स्तरावर ग्राहकांना त्यांचे जुने रेकॉर्ड बघून किस्त सुविधा देत आहेत. ही योजना कोरोना संक्रमणकाळापर्यंतच होती. ही योजना समाप्त केल्यामुळे राज्य आता कोरोनामुक्त झाला आहे का आणि अर्थव्यवस्था सुरळीत झाली आहे का, असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहे.
..........