आता निवडणूक कामातून पळवाट नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:00 AM2019-02-28T11:00:58+5:302019-02-28T11:02:39+5:30

निवडणुकीचे काम हे देशहिताचे काम असले तरी निवडणूक लागली की, अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वेगवेगळी कारणे सांगून निवडणुकीच्या कामातून पळवाट काढत असतात. परंतु आता अशा कर्मचाऱ्यांना पळवाट काढता येणार नाही.

Now, there is no loophole in the election work | आता निवडणूक कामातून पळवाट नाही

आता निवडणूक कामातून पळवाट नाही

Next
ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांचे कोषागार विभागाला पत्रनिवडणूक विभागाच्या एनओसीनंतरच पगार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीचे काम हे देशहिताचे काम असले तरी निवडणूक लागली की, अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वेगवेगळी कारणे सांगून निवडणुकीच्या कामातून पळवाट काढत असतात. परंतु आता अशा कर्मचाऱ्यांना पळवाट काढता येणार नाही. कारण निवडणूक विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रानंरतच (एनओसी) अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार काढावे, असे पत्र जिल्हाधिकारी यांनी कोषागार विभागाला दिले आहे. यामुळे निवडणुकीच्या कामापासून पळवाट काढणाºयांची चांगलीच अडचण होणार आहे.
निवडणुकीचे काम देशहिताचे आहे. या कामाला प्राथमिकता देणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणूक होणार असून याची तयारी प्रशासनकडून करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात नागपूर आणि रामटेक अशा दोन लोकसभा जागा आहेत. या कामासाठी जवळपास ४० हजार कर्मचाऱ्यांनी गरज भासणार आहे.
महूसल विभागाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने इतर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा या कामासाठी घेण्यात येते. या करता जिल्हा निवडणूक विभागाने सर्व विभाग प्रमुखांना पत्र पाठवून अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास सांगितले आहे.
मात्र आतापर्यंत अनेक विभागाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नावेच पाठविण्यात आली नाही. काहींची नावे असली तरी अद्याप नोंद केली नाही. यामुळे निवडणुकीच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
संबंधित विभागप्रमुखांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आली नसल्याने जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार करताना निवडणूक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय पगारच काढू नये, असे पत्रच जिल्हाधिकारी यांनी कोषागार विभागाला पाठविले आहे. यामुळे आता निवडणूक कामात रुजू न होणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांना पगारच होणार नसल्याचे सांगण्यात येते.
त्याच प्रमाणे काही विभागांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांकडून मिळाली.

Web Title: Now, there is no loophole in the election work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.