आता अनारक्षित रेल्वेगाड्या नव्या क्रमांकाने ओळखल्या जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 03:28 PM2024-11-27T15:28:13+5:302024-11-27T15:31:41+5:30
२० लोकल 'मेमू'च्या क्रमांकांत बदल : १ जानेवारीपासून बदल लागू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात धावणाऱ्या तब्बल २० गाड्यांचे क्रमांक बदलविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. लोकल मेमू गाड्यांच्या संबंधाने घेतलेला हा नवीन निर्णय १ जानेवारी २०२५ पासून लागू केला जाणार असून, त्या गाड्या खालीलप्रमाणे आहेत.
गाडी क्रमांक ०१२०३ मेमू नागपूर ते आमला आता गाडी क्रमांक ६१११७ या म्हणून (नावाने) धावेल. गाडी क्रमांक ०१२०४ मेमू आमला ते नागपूर आता गाडी क्रमांक ६१११८ या नावाने, गाडी क्रमांक ०१३१५ मेमू वर्धा ते बल्लारशाह आता गाडी क्रमांक ६११२७ या नावाने, गाडी क्रमांक ०१३१६ मेमू बल्लारशाह ते वर्धा आता गाडी क्रमांक ६११२८ या नावाने, गाडी क्रमांक ०१३१७ मेमू आमला ते इटारसी आता गाडी क्रमांक ६११२१ या नावाने, गाडी क्रमांक ०१३१८ मेमू इटारसी ते आमला आता गाडी क्रमांक ६११२२ या नावाने, गाडी क्रमांक ०१३१९ मेमू आमला ते छिंदवाडा आता गाडी क्रमांक ६११२३ या नावाने, गाडी क्रमांक ०१३२० मेमू छिंदवाडा ते आमला आता गाडी क्रमांक ६११२४ या नावाने, तर गाडी क्रमांक ०१३२१ मेमू आमला ते छिंदवाडा आता गाडी क्रमांक ६११२५ या नावाने धावेल. गाडी क्रमांक ०१३२२ मेमू छिंदवाडा ते आमला आता गाडी क्रमांक ६११२६ या नावाने, गाडी क्रमांक ०१३२३ मेमू नागपूर ते आमला आता गाडी क्रमांक ६१११९ या नावाने, गाडी क्रमांक ०१३२४ मेमू आमला ते नागपूर आता गाडी क्रमांक ६११२० या नावाने, गाडी क्रमांक ०१३६७ मेमू बडनेरा ते नरखेड आता गाडी क्रमांक ६११०३ या नावाने, गाडी क्रमांक ०१३६८ मेमू नरखेड ते बडनेरा आता गाडी क्रमांक ६११०४ या नावाने, गाडी क्रमांक ०१३६९ मेमू बडनेरा ते नरखेड आता गाडी क्रमांक ६११०५ या नावाने, गाडी क्रमांक ०१३७० मेमू नरखेड ते बडनेरा आता गाडी क्रमांक ६११०६ या नावाने, गाडी क्रमांक ०१३७१ मेमू न्यू अमरावती ते वर्धा आता गाडी क्रमांक ६११०७ या नावाने, गाडी क्रमांक ०१३७२ मेमू वर्धा ते न्यू अमरावती आता गाडी क्रमांक ६११०८ या नावाने, गाडी क्रमांक ०१३७३ मेमू न्यू अमरावती ते नागपूर आता गाडी क्रमांक ६११०९ या नावाने आणि गाडी क्रमांक ०१३७४ मेमू नागपूर ते वर्धा आता गाडी क्रमांक ६१११० या नावाने धावेल.
यातून काय साध्य होणार ?
या गाड्यांचे क्रमांक बदलविण्यात येणार असले तरी गाड्यांच्या वेळापत्रकात किवा संरचनेत दुसरा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, गाड्यांचे क्रमांक बदलवून काय साध्य होणार, या प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही.