आता राळेगण सिद्धीच्या धर्तीवर नागपुरातील बंधारयांची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:02 PM2017-11-17T22:02:34+5:302017-11-17T22:13:36+5:30

नागपूर जिल्ह्यातील बंधारयाची कामेसुद्धा आता राळेगण सिद्धीच्या धर्तीवर करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या.

Now the works of the dam on the lines of Ralegan Siddhi | आता राळेगण सिद्धीच्या धर्तीवर नागपुरातील बंधारयांची कामे

आता राळेगण सिद्धीच्या धर्तीवर नागपुरातील बंधारयांची कामे

Next
ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सूचनाजलयुक्त शिवार अभियान कामांचा घेतला आढावा

आॅनलाईन लोकमत
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बंधारयाची कामेसुद्धा आता राळेगण सिद्धीच्या धर्तीवर करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या.
बचत भवन येथे नागपूर जिल्ह्यातील जलसंधारण व जलयुक्त शिवार कामासंदर्भात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ते बोलत होते. यावेळी आमदार समीर मेघे, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, रोहयो उपजिल्हाधिकारी मनिषा जायभाये उपस्थित होते.
नदी, नाल्याचे पाणी अडवून बंधारा बांधण्यात येतो. या बंधाºयात अधिक जलसाठा शिल्लक राहावा, याकरिता बंधाºयाची कामे राळेगणसिद्धी येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्या प्रमाणे करण्यात यावी. याकरिता प्रत्यक्ष राळेगणसिद्धी येथील बंधाऱ्या ची पाहणी करून अहवाल तयार करण्याच्या सूचना सुद्धा पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्याना केल्या.
पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी यावेळी दिली. तसेच शासकीय विभाग आणि लोकसहभागातून पहिल्याच वर्षी ३१३ गावांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार मृदा व जलसंधारणाची ५ हजार ५१ कामे पूर्ण करण्यात आली. ६१.८८ लाख घनमीटर नाल्यातील व तलावातील गाळ काढण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानात २०१६-१७ या वर्षात ११९ गावे जलपरिपूर्ण झाली आहे. या अभियानातंर्गत २०१७-१८ या वर्षात नागपूर जिल्ह्यातील २२० गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. माथा ते पायथा तत्त्वावर निवडण्यात आलेल्या गावांमध्ये ३ हजार ४१९ कामे प्रस्तावित करण्यात आली असून, या कामांवर १५० कोटी ८४ लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली.

तीन वर्षात ४३२ गावे जलयुक्त
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात तीन वर्षात ४९८ गावांपैकी ४३२ गावे जलयुक्त झाली आहेत. विविध उपाययोजनांमुळे शाश्वत सिंचनासोबतच पिण्याच्या पाणी टंचाईवर मात करतानाच भूगर्भातील जलाशयात लक्षणीय वाढ झाली आहे.

रस्तेही होणार खड्डेमुक्त

नागपूर शहरातील विविध रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे जनतेला त्रास होणार नाही, यादृष्टीने विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येक रस्त्यांची पाहणी करुन येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण खड्डे बुजविण्याचा कार्यक्रम तयार करा तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डेही १५ डिसेंबरपर्यंत पूर्णपणे बुजवा असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात खड्डेमुक्त रस्ते या विषयावर विविध विभागांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आमदार समीर मेघे, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, आमदार सुधाकर देशमुख, जिल्हा परिषद सभापती निशा सावरकर, नागपूर महानगरपालिका आयुक्त अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे सह संबंधित विभागाचे अभियंता, उपअभियंता उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांवर ८ ते १० हजार खड्डे असून यासाठी कालबद्ध कार्यक्रमानुसार अंमलबजावणी करावी, यासाठी कार्यकारी अभियंता व संबंधित उप अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
ग्रामीण भागातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे. विशेषत: तारसा- निमखेडा, कन्हान- तारसा, कान्हान- निमखेडा मार्गावर सतत वर्दळ सुरू त्वरित दखल घेऊन खड्डे बुजविण्यात यावे. तसेच नॅशनल हायवेवरील १६७ किलोमीटरचा रस्ता दुरुस्त करा. या व्यतिरिक्त काटोल, रामटेक, नरखेड, उमरेड- कुही , कामठी या विधानसभा मतदारसंघनिहाय खड्डे असलेल्या रस्त्यांचा अहवाल तयार करुन रस्ते दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील विविध ५० रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे असून अपघाताला आव्हान दिल्या जात असल्याने या मार्गावरील खड्डे बुजविण्याकरिता नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अभियंतांना या बैठकीत देण्यात आल्या.

Web Title: Now the works of the dam on the lines of Ralegan Siddhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण