आता घरी लग्न करण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 12:15 AM2021-03-05T00:15:31+5:302021-03-05T00:17:48+5:30

Now marriage permission वाढत्या कोरोनामुळे मंगल कार्यालय, लॉन आदी ठिकाणी होणाऱ्या लग्न समारंभ व इतर समारंभाच्या आयोजनास प्रतिबंध लावण्यात आले आहे. परंतु आता घरी लग्न किंवा इतर समारंभ करायचा असेल तरी सुद्धा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

Now you have to get permission to get married at home | आता घरी लग्न करण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी

आता घरी लग्न करण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाढत्या कोरोनामुळे मंगल कार्यालय, लॉन आदी ठिकाणी होणाऱ्या लग्न समारंभ व इतर समारंभाच्या आयोजनास प्रतिबंध लावण्यात आले आहे. परंतु आता घरी लग्न किंवा इतर समारंभ करायचा असेल तरी सुद्धा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी गुरुवारी काढले आहेत. हे आदेश ग्रामीण भागातील नागरिकांसाठी लागू राहतील.

या आदेशानुसार ज्यांना आपले राहते घरी लग्न समारंभ, आयोजित करायचा असेल तर संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकांनी संबंधित गट विकास अधिकारी, ग्राम विकास अधिकारी यांना तसेच नगर, पंचायत, नगरपरिषद क्षेत्रातील लोकांनी संबंधित मुख्याधिकारी याांना माहितीकरिता सूचना द्यावी. तसेच शासनाद्वारे वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Now you have to get permission to get married at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.