१०८ नंबरला साडेसाती

By admin | Published: June 27, 2017 01:40 AM2017-06-27T01:40:49+5:302017-06-27T01:40:49+5:30

गंभीर रुग्णांना जागेवरच वैद्यकीय सेवा देऊन त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात पोहचविण्याची जबाबदारी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची आहे.

Number 108 on the number 108 | १०८ नंबरला साडेसाती

१०८ नंबरला साडेसाती

Next

कशी मिळणार रुग्णांना तातडीची सेवा?
तीन किलोमीटरचे अंतर कापायला रुग्णवाहिकेला लागतात २० मिनिटे
रुग्णांना निवडावा लागतो दुसरा पर्याय

सुमेध वाघमारे/ विशाल महाकाळकर। लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंभीर रुग्णांना जागेवरच वैद्यकीय सेवा देऊन त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात पोहचविण्याची जबाबदारी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची आहे. परंतु पहिल्या प्रयत्नात हा क्रमांकच लागत नाही. पलीकडून ‘पुन्हा प्रयत्न करा’ असे उत्तर मिळते. वारंवार ‘डायल’ करण्याची वेळ येते. शिवाय, तांत्रिक अडचणींमुळे रुग्णवाहिका रुग्णस्थळी वेळेत पोहचत नाही. तीन किलोमीटरचे अंतर कापायला २० मिनिटांवर कालावधी लागतो. अशा अनेक अडचणींना रुग्णाला सामोरे जावे लागत असल्याने अनेकांवर दुसरा पर्याय निवडण्याची वेळ येते.
आठवेळा प्रयत्न केल्यानंतर लागला फोन
‘लोकमत’चमूने त्रिमूर्ती नगर चौक येथून दुपारी २.४५ वाजता १०८ क्रमांकाला फोन लावण्याचे प्रयत्न केला. परंतु ‘बीप’चा आवाज येऊन फोन ‘कट’ होत होता. दुसऱ्या मोबाईलवरून हा प्रयत्न केला असता पुन्हा तोच अनुभव आला. तिसऱ्या-चौथ्या प्रयत्नानंतर ‘पुन्हा प्रयत्न करून पाहा’ असे उत्तर मिळाले. तब्बल आठवेळा प्रयत्न केल्यानंतर १०८ क्रमांकाशी जुळता आले.
‘लोकमत’ चमूने सोमवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून १०८ क्रमांकावर डायल करून या रुग्णवाहिकेची मदत मागितली असता हे वास्तव सामोर आले.
सार्वजनिक आरोग्य विभागाने २६ जानेवारी २०१४ पासून संपूर्ण राज्यात १०८ क्रमांक रुग्णवाहिकेची नि:शुल्क सेवा उपलब्ध करून दिली. सध्या नागपूर जिल्ह्यात ४२ , तर शहरात २२ रुग्णवाहिका आहेत. यातील सहा ‘अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ तर १६ ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिकांना शहरातील विविध ठिकाणे नेमून दिली आहेत. यात शासकीय रुग्णालयांसोबतच, महानगरपालिकेची रुग्णालये, महानगरपालिकेची झोन कार्यालये व काही पोलीस ठाणे आहेत. साधारण १०-१५ किलोमीटरचे क्षेत्र या रुग्णवाहिकांना देण्यात आले आहे. प्रत्येक रुग्णाला जागेवरच रुग्णसेवा मिळावी यासाठी रुग्णवाहिकेमध्ये एक डॉक्टर व त्यांच्यासोबतील जीवनरक्षक औषधे आणि उपकरण उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे ही योजना काहींसाठी जीवनदायी ठरत असली तरी याचा फारसा उपयोग होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

‘एसी’ बंद राहिल्यास गुदमरल्यासारखे होते
नेहमी रुग्णाच्या मदतीला धावून जाणारे, सुनील जवादे यांनी सांगितले, अनेकवेळा या रुग्णवाहिकेचे वातानुकूलित यंत्र (एसी) बंद असते. व्हेंटिलेटरची सोय नसल्याने अशावेळी गुदमरल्यासारखे होते.
मेडिकलमध्ये
लागतो वेळ
१०८ च्या एका डॉक्टरने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, गंभीर रुग्णांना शासकीय रुग्णालयात पोहचविल्यावर आम्हाला दुसऱ्या ‘कॉल’साठी तयार राहावे लागते. परंतु मेयो, मेडिकलमध्ये रुग्ण पोहचल्यावर तेथील अटेन्डंट मदत करीत नाही. आमच्याच स्ट्रेचरवर रुग्ण ठेवून बाह्यरुग्ण विभाग, अपघात विभाग आणि नंतर वॉर्डात फिरविले जाते. यात अर्ध्या तासाच्यावर वेळ जातो. अशावेळी दुसऱ्या रुग्णापर्यंत पोहचण्यास उशीर होतो.

१६ मिनिटात पोहचली रुग्णवाहिका
त्रिमूर्तीनगर चौकात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मदत मागितली असता सुरुवातीला फोन ‘पुणे’ येथे गेला. तेथील ‘आॅपरेटरला’ नागपूरची माहिती नव्हती. यामुळे त्याला पत्ता समजावून घ्यायलाच तीन ते चार मिनिटांचा वेळ लागला. त्यांनी नागपूरच्या संबंधित रुग्णवाहिकेला तो नंबर जुळवून दिल्यानंतर पुन्हा पत्ता सांगावा लागला. यात आणखी तीन ते चार मिनिटे गेली. परंतु बोलणे संपताच १६व्या मिनिटांत रुग्णवाहिका त्रिमूर्तीनगर चौकात पोहचली.
मेडिकल वंजारीनगर पोहोचायला लागली २० मि.
‘लोकमत’ चमूने वंजारीनगर पाण्याच्या टाकीजवळून एका रुग्णाच्या मदतीसाठी १०८ वर फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंबर न लागण्याचा जुनाच अनुभव पुन्हा आला. ४.५९ वाजता फोन जुळल्यावर नागपूरच्या संबंधित डॉक्टरला फोनवर यायला तीन ते चार मिनिटांचा वेळ लागला. पत्ता विचारल्यावर पोहचायला २० मिनिटे लागली. यामुळे ज्या रुग्णासाठी ही रुग्णवाहिका बोलविली तो आॅटोरिक्षाने निघून गेला.
रुग्णवाहिकेत लागतात दचके
१०८ क्रमांकाचा अनुभव घेतलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना याविषयी विचारले असता, त्यांनी सांगितले, ‘बेसिक लाईफ सपोट’ची ‘डॉक्स प्लस’ नावाची वाहने रुग्णांसाठी नसल्यासारखीच आहे. रुग्णवाहिका असूनही फार दचके लागतात. छोटा खड्डा आला तरी वाहन उसळते. यामुळे एका जणाला रुग्णाला पकडून बसावे लागते.

Web Title: Number 108 on the number 108

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.