नागपुरात प्रवाशांच्या तुलनेत कमी पडताहेत बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 09:10 PM2020-08-26T21:10:46+5:302020-08-26T21:12:15+5:30
एसटी बसमध्ये २२ प्रवासी प्रवास करू शकतात. परंतु एखाद्यावेळी ७० प्रवासी एखाद्या गावाला जाणार असल्यास एसटी महामंडळाची पंचाइत होत आहे. अशावेळी बसेसची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न एसटी महामंडळाला पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी बसमध्ये २२ प्रवासी प्रवास करू शकतात. परंतु एखाद्यावेळी ७० प्रवासी एखाद्या गावाला जाणार असल्यास एसटी महामंडळाची पंचाइत होत आहे. अशावेळी बसेसची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न एसटी महामंडळाला पडला आहे.
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात शहरात २६० आणि ग्रामीण विभागात २३० बसेस आहेत. एसटी महामंडळाने आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बसेसची वाहतूक सुरू झाली. दोन दिवस प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. परंतु दोन दिवसानंतर प्रवाशांची संख्या वाढली. प्रवासी अधिक आणि बसेस कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बसेसची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.
बसेसची संख्या कमी पडत असल्यास एसटीने योग्य नियोजन करावे. प्रवाशांची संख्या पाहून बसेस सोडण्याची गरज आहे.
अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना