कॉपीचे प्रमाण २४ टक्क्यांनी घटले : नागपूर विभागात ७१ कॉपीबहाद्दर दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 09:28 PM2019-05-28T21:28:14+5:302019-05-28T21:28:56+5:30
गेल्या काही वर्षांपासून मंडळाचे कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे. यंदा नागपूर विभागामध्ये कॉपीची ७३ प्र्रकरणे आढळली असून यामध्ये ७१ विद्यार्थी दोषी आढळले आहेत. मागील वर्षी ९४ विद्यार्थी दोषी आढळले होते व यंदा कॉपीचे प्रमाण २४ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही वर्षांपासून मंडळाचे कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे. यंदा नागपूर विभागामध्ये कॉपीची ७३ प्र्रकरणे आढळली असून यामध्ये ७१ विद्यार्थी दोषी आढळले आहेत. मागील वर्षी ९४ विद्यार्थी दोषी आढळले होते व यंदा कॉपीचे प्रमाण २४ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले.
परीक्षा काळात मंडळातर्फे भरारी पथकांच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर नजर ठेवण्यात येत होती. विभागात ७३ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले. यातील ७१ जण दोषी आढळले. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ४४ विद्यार्थी दोषी आढळून आले. मागील वर्षीदेखील गडचिरोली जिल्ह्यात ४६ कॉपीबहाद्दरांवर कारवाई झाली होती.
भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मागील वर्षी कॉपीची प्रत्येकी १० व ८ प्रकरणे आढळली होती. यंदा मात्र हे प्रमाण प्रत्येकी अनुक्रमे २ व ८ इतके आहे.
नागपूर जिल्ह्यात ४ कॉपीबहाद्दर सापडले, तर गोंदियामध्ये १० विद्यार्थी कॉपीच्या प्रकरणात दोषी आढळले. उत्तरपत्रिकांवर आपला मोबाईल क्रमांक, गुण देण्यासाठी विनंती, धमकी इत्यादी लिहिणारे काही विद्यार्थी असतात. परीक्षा झाल्यानंतर मूल्यांकनाच्या वेळी अशी १७ प्रकरणे आढळून आली. यातील सात विद्यार्थी दोषी ठरले आहेत.
दोषींची आकडेवारी
जिल्हा संख्या (२०१९) संख्या (२०१८)
भंडारा २ १०
चंद्रपूर ८ ८
नागपूर ४ ८
वर्धा ३ ३
गडचिरोली ४४ ४६
गोंदिया १० १८
एकूण ७१ ९४
वर्षनिहाय कॉपीतील दोषी विद्यार्थी
वर्ष विद्यार्थी
२०१५ ११२
२०१६ ७५
२०१७ १५४
२०१८ ९४
२०१९ ७१