कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:11 AM2021-08-15T04:11:24+5:302021-08-15T04:11:24+5:30

नागपूर : कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णसंख्येत किंचित वाढ झाल्याचे दिसून येत ...

The number of corona patients is increasing! | कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय!

कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय!

Next

नागपूर : कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णसंख्येत किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान ४० रुग्ण आढळून आले असताना ८ ते १४ ऑगस्ट दरम्यान ४३ रुग्णांची नोंद झाली. शनिवारी ९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,९२,९६८ तर मृतांची संख्या १०,११८वर स्थिर आहे.

नागपूर जिल्ह्यात सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल होत आहेत. यामुळे प्रत्येकांकडून कोरोना नियमांचे पालन होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. मागील तीन आठवड्यांची तुलना केली असता, २५ ते ३१ जुलै या आठवड्यात ७२ रुग्ण व १ मृत्यूची नोंद झाली. १ ते ७ ऑगस्ट या आठवड्यात ३३,४८३ चाचण्यांमधून ४० रुग्ण व १ मृत्यू झाला. पॉझिटिव्हीटीचा दर ०.११ टक्के होता. तर या आठवड्यात चाचण्यांची संख्या वाढून ३४, ७९८ झाली असून ४३ रुग्ण व १ मृत्यू नोंदविण्यात आला आहे. पॉझिटिव्हीटीचा दर ०.१२ टक्के झाला आहे.

-या आठवड्यात १०२ रुग्ण बरे

मागील आठवड्यात ६२ रुग्ण बरे झाले असताना या आठवड्यात १०२ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ४,८२,७२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९२ टक्के आहे. सध्या १२३ कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहेत. यातील ५४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ६९ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

:: कोरोनाची शनिवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ४,२९२

शहर : ४ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : ३ रुग्ण व ० मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,९२,९६८

ए. सक्रिय रुग्ण : १२३

ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,७२७

ए. मृत्यू : १०,११८

Web Title: The number of corona patients is increasing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.