विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख २३ हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:09 AM2021-03-08T04:09:27+5:302021-03-08T04:09:27+5:30
नागपूर : विदर्भात कोरोनाच्या वाढत्या संख्येने चिंता वाढली आहे. रविवारी पुन्हा रुग्णसंख्येने तीन हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला. ३३४६ नव्या ...
नागपूर : विदर्भात कोरोनाच्या वाढत्या संख्येने चिंता वाढली आहे. रविवारी पुन्हा रुग्णसंख्येने तीन हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला. ३३४६ नव्या रुग्णांची नोंद झाली तर, २० रुग्णांचा जीव गेला. कोरोनाच्या प्रादुर्भावाला एक वर्षाचा कालावधी झाला असताना आज रुग्णसंख्येने ३ लाख २३ हजारांचा टप्पाही ओलांडला. रुग्णांची एकूण संख्या २,२३, ७८० झाली. सक्रिय सोबतच गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर समस्या उभी झाली आहे. आज नागपूर जिल्ह्यात १२७१ रुग्ण व ७ मृत्यूची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यातील रुग्णसंख्या निम्म्यावर आली असली तरी मृत्यूचा आकडा वाढला. ४४६ रुग्ण व ७ मृत्यू झाले. बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा वेग कायम आहे. बुलडाण्यात ३७९ रुग्ण व २ मृत्यू तर अकोला जिल्ह्यात ३४० रुग्ण व २ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. वर्धेत आज ५ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले तर १९९ रुग्ण आढळून आले.
जिल्हा नवे रुग्ण ए. रुग्ण मृत्यू
नागपूर १२७१ १५७७२९ ०७
वर्धा १९९ १३५१५ ०५
चंद्रपूर ८६ २४२०२ ००
भंडारा ३८ १३९२९ ००
गोंदिया १५ १४५४५ ००
गडचिरोली २९ ९६९२ ००
अमरावती ४४६ ३९५२४ ०७
यवतमाळ ३०१ १९२७४ ०३
वाशिम २४२ १०२२० ०१
बुलडाणा ३७९ २१३०४ ०२
अकोला ३४० १९१२० ०२