विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या स्थिर : २,८९६ नवे रुग्ण, १९ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 10:00 PM2021-02-27T22:00:38+5:302021-02-27T22:02:24+5:30
coronaviruses stable in Vidarbha विदर्भात सलग तीन दिवसांपासून ३ हजारावर कोरोनाबाधितांची नोंद झाली असताना शनिवारी त्यात घट आली. २८९६ नव्या रुग्णांची भर पडली तर १९ रुग्णांचे जीव गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात सलग तीन दिवसांपासून ३ हजारावर कोरोनाबाधितांची नोंद झाली असताना शनिवारी त्यात घट आली. २८९६ नव्या रुग्णांची भर पडली तर १९ रुग्णांचे जीव गेले. तूर्तास तरी बाधितांची संख्या स्थिर असल्याचे दिसून येत आहे. रुग्णांची एकूण संख्या ३,१६,४३६ झाली आहे. आज सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली. ९८४ रुग्ण व १० बळी गेले. अमरावतीमध्ये ६४० रुग्ण व २ मृत्यू नोंदविण्यात आले. या शिवाय, बुलडाण्यात ३४९ रुग्ण, अकोल्यात २८० रुग्ण व ३ मृत्यू, यवतमाळमध्ये २३३ रुग्ण व २ मृत्यू, वर्धा जिल्ह्यात १५५ रुग्ण व २ मृत्यू तर वाशिम जिल्ह्यात १२६ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
जिल्हा रुग्ण ए. रुग्ण मृत्यू
नागपूर ९८४ १४८८८९ १०
भंडारा ४० १३६५२ ००
वर्धा १५५ १२०३२ ०२
गोंदिया २२ १४४२२ ००
गडचिरोली २१ ९५३५ ००
चंद्रपूर ४६ २३६०४ ००
अमरावती ६४० ३४२२५ ०२
अकोला २८० १५६७२ ०३
यवतमाळ २३३ १७३३० ०२
बुलडाणा ३४९ १८३२८ ००
वाशिम १२६ ८७४७ ००