नागपूरात ‘सायबर’ गुन्ह्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढता; भावनिक बाजाराचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 07:15 AM2021-10-29T07:15:00+5:302021-10-29T07:15:02+5:30

Nagpur News ‘सोशल’ माध्यमांवरील ‘चॅट रूम्स’वर अनोळखी व्यक्तींशी संवाद करणे टाळले पाहिजे, असे मत सायबरतज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केले आहे.

The number of 'cyber' crimes in Nagpur is increasing day by day; Get rid of the emotional market | नागपूरात ‘सायबर’ गुन्ह्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढता; भावनिक बाजाराचा विळखा

नागपूरात ‘सायबर’ गुन्ह्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढता; भावनिक बाजाराचा विळखा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘चॅट रूम्स’वर अनोळखी व्यक्तींशी संवाद धोकादायक‘सोशल मीडिया’वर वेळीच सावध होण्याची गरज


नागपूर : सबकुछ ऑनलाईनच्या युगात बहुतांश सुशिक्षित लोक बराच वेळ ‘सोशल मीडिया’वर घालवितात. अनेक जण एकटेपणाच्या भावनेतून अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना दिसून येतात. मात्र ‘टॉक टू अ स्ट्रेंजर’चा हा प्रकार धोकादायक ठरू शकतात व यातूनच मोठ्या प्रमाणावर ‘सायबर’गुन्हे घडताना दिसून येतात. ‘सोशल’ माध्यमांवरील ‘चॅट रूम्स’वर अनोळखी व्यक्तींशी संवाद करणे टाळले पाहिजे, असे मत सायबरतज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केले आहे.

नागपूरात ‘सायबर’ गुन्ह्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. इतर मोठ्या शहरांसोबतच उपराजधानीत देखील सायबर गुन्ह्यांची संख्या वाढीस लागली आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये गुन्ह्यांची संख्या १०४ टक्क्यांनी वाढली. सायबर गुन्हेदरात नागपूरचा क्रमांक देशात आठवा होता. २०२० साली नागपुरात सायबर गुन्ह्यांचे २४३ गुन्हे दाखल झाले. २०१९ मध्ये हाच आकडा ११९ इतका होता. २०२० मधील तब्बल १४१ गुन्हे हे फसवणुकीचे होते, तर २३ गुन्हे महिलांची छळवणूक करण्याचे होते. अनेक ‘सायबर’ गुन्हे प्रत्यक्षात पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत. ‘चॅट रूम्स’मध्ये अनावश्यक माहिती अनोळखी व्यक्तींना सांगितल्यामुळे अनेकांना फटका बसतो. संबंधित प्रकरणांत तक्रार झाल्यास बदनामी होईल या भितीपोटी लोक तक्रार करायला पुढे येत नाहीत. एकटेपणाची भावना असलेले लोक मानसिक आधारासाठी ‘चॅटरूम्स’कडे वळतात. ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’च्या मोहात अडकून नागपुरातील अनेक नेटकºयांनी स्वत:चे नुकसान करून घेतले असल्याचे अजित पारसे यांच्या ‘सायबर’ गुन्हेगारीचे विश्लेषणातून समोर आले आहे.

‘रेकॉर्ड’च्या आधारे होते छळवणूक

‘सोशल मीडिया’चा वापर करताना कुणाशीही फ्रेंडशिप करणे, अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणे आणि आपली वैयक्तिक माहिती शेअर करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. काही ‘चॅटरूम्स’ तर ओळख जाहिर करत नसल्याचा दावा करतात. नको त्या मनोरंजनाच्या हव्यासापोटी काहींचा तोल सुटतो. मनमोकळ्या संवादाचे गुन्हेगार ‘रेकॉर्ड’ तयार करतात व त्याच्या आधारे ‘युझर्स’ची छळवणूक सुरू होते. त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगायला हवी. कुटुंबातील प्रत्येकाला व्यक्तिगत माहिती ‘शेअर’ करण्याचे धोके समजावून सांगावे, असे आवाहन पारसे यांनी केले.

Web Title: The number of 'cyber' crimes in Nagpur is increasing day by day; Get rid of the emotional market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.