जिल्ह्यात संक्रमितांचा आकडा २ लाखांच्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:08 AM2021-03-25T04:08:17+5:302021-03-25T04:08:17+5:30

राजीव सिंह नागपूर : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमणाने उद्रेक केला आहे. बुधवारी जिल्ह्यातील संक्रमितांचा आकडा २ लाखांच्या पार पाेहचला. ...

The number of infected people in the district has crossed 2 lakh | जिल्ह्यात संक्रमितांचा आकडा २ लाखांच्या पार

जिल्ह्यात संक्रमितांचा आकडा २ लाखांच्या पार

googlenewsNext

राजीव सिंह

नागपूर : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमणाने उद्रेक केला आहे. बुधवारी जिल्ह्यातील संक्रमितांचा आकडा २ लाखांच्या पार पाेहचला. उल्लेखनीय म्हणजे रुग्णांची संख्या दीड लाखाहून दाेन लाखावर पाेहचण्यासाठी केवळ २३ दिवसांचा वेळ लागला. पहिल्या लाटेत संक्रमितांची संख्या ५० हजारावर पाेहचण्यासाठी १८६ दिवसांचा काळ लागला हाेता. मात्र यावेळी केवळ २३ दिवसात ही संख्या गाठली. यावरून दुसऱ्या लाटेत काेराेनाचे संक्रमणाने भीषण रुप धारण केल्याचा अंदाज येऊ शकताे.

जिल्ह्यात ११ मार्च २०२० राेजी पहिला रुग्ण आढळला हाेता. त्या पहिल्या महिन्यात १६ लाेक पाॅझिटिव्ह आढळले हाेते. एप्रिल मध्ये १२३, मे मध्ये ३९२, जून मध्ये ९७२ मिळाले हाेते. त्यानंतर मात्र स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. जुलै महिन्यात ३८८९, ऑगस्टमध्ये तब्बल २४,१६३ रुग्णांची भर पडली. सप्टेंबर महिन्यात पहिली लहर जाेरात हाेती. यावेळी ४८,४५७ लाेक पाॅझिटिव्ह आढळून आले. नाेव्हेंबर महिन्यात संक्रमणाचा वेग मंदावला. या महिन्यात ८९७९ रुग्ण मिळाले. डिसेंबर महिन्यात १२००२, यावर्षी जानेवारीत १०५०७, फेब्रुवारीत १५५१४ रुग्ण सापडले. फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यात संक्रमणाचा वेग पुन्हा वाढला, जाे अद्यापही कायम आहे.

२४ दिवसात ४०२ मृत्यू

मार्च २०२१ मध्ये महिनाभरातील २४ दिवसात ४०२ काेराेना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २७,९७९ रुग्ण बरे हाेऊन घरी परतले. मात्र सक्रिय रुग्णांची संख्या ८२५३ हून वाढून ३३५७२ वर पाेहचली आहे. मार्चच्या २४ दिवसात २५३१९ सक्रिय रुग्णांची भर पडली.

सप्टेंबरमध्ये मंदावेल संक्रमणाचा वेग

जानकारांच्या मते संक्रमण वाढले असले तरी सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत मार्चच्या संक्रमणाचा वेग कमी आहे. तपासलेले नमुने व पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे आकलन केले असता १९.१७ टक्के नमुने यावर्षी मार्चमध्ये पाॅझिटिव्ह आढळल्याचे लक्षात येते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात १,९६,७२२ नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ४८,४५७ लाेक संक्रमित आढळले हाेते. यावरून २४.६३ टक्के म्हणजे प्रत्येक चाैथी व्यक्ती पाॅझिटिव्ह येत हाेती. यावर्षी मार्चच्या २४ दिवसात २ लाख ७९ हजार ९८५ नमुन्यांची तपासणी करण्यात आले. यामधून ५३७०० नमुने पाॅझिटिव्ह आढळले. म्हणजे १९.१७ टक्के नमुने पाॅझिटिव्ह आले.

२ लाख पार करण्यास लागलेले दिवस

- पहिले ५० हजार संक्रमित १८६ दिवसात

- दुसरे ५० हजार संक्रमित ४९ दिवसात

- तिसरे ५० हजार संक्रमित १२१ दिवसात

- चौथे ५० हजार संक्रमित २३ दिवसात

असे वाढले संक्रमित

१२ सप्टेंबर २०२० ५०१२८

३१ ऑक्टाेबर २०२० १०२७८६

१ मार्च २०२१ १५०६६५

२४ मार्च २०२१ २०३४८८

Web Title: The number of infected people in the district has crossed 2 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.