विमानतळावरील प्रवासीसंख्येत २९ लाखांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:13 AM2021-08-20T04:13:09+5:302021-08-20T04:13:09+5:30

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील मार्च महिन्यापासून उद्भवलेल्या कोरोना संसर्गाचा ‘एमआयएल’ला (मिहान इंडिया लिमिटेड) मोठा फटका ...

The number of passengers at the airport has dropped by 29 lakh | विमानतळावरील प्रवासीसंख्येत २९ लाखांनी घट

विमानतळावरील प्रवासीसंख्येत २९ लाखांनी घट

Next

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील मार्च महिन्यापासून उद्भवलेल्या कोरोना संसर्गाचा ‘एमआयएल’ला (मिहान इंडिया लिमिटेड) मोठा फटका बसला आहे. २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ‘एमआयएल’च्या महसुलात तब्बल ६२ टक्क्यांनी घट झाली आहे. दुसरीकडे, विमानतळावरील प्रवाशांची संख्यादेखील प्रचंड घटली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत ‘एमआयएल’कडे विचारणा केली होती. ‘एमआयएल’कडून प्राप्त झालेली २०२०-२१ च्या माहितीची २०१९-२० च्या आकडेवारीशी तुलना केली असता ‘एमआयएल’ला झालेल्या नुकसानीचा आकडा समोर आला आहे. २०१९-२० मध्ये ‘एमआयएल’ला महसुलातून ११८ कोटी ९७ लाख ४० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता व त्या वर्षाचा खर्च ५४ लाख ९३ लाख २० हजार इतका होता. एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत ‘एमआयएल’ला ४५ कोटी ७४ लाख रुपयांचा महसूल मिळाला व खर्चाचा आकडा त्याहून जास्त म्हणजे ४६ कोटी ९२ लाख इतका होता. २०१९-२० च्या तुलनेत महसुलात ७२ कोटींहून अधिक घट झाली.

प्रवाशांची लाखांची संख्या हजारांवर आली

सन २०१९-२० मध्ये आगमन व उड्डाण केलेल्या प्रवाशांची एकूण संख्या ३० लाख ५६ हजार इतकी होती. नागपूर विमानतळावरील प्रवाशांचा हा विक्रमच होता. एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत केवळ ७५ हजार ५४३ प्रवासी विमानतळावर आले. प्रवाशांची संख्या २९ लाखांहून अधिकने घटली.

खासगी विमानांच्या महसुलात वाढ

इतर महसूल घटला असला तरी खासगी विमानांपासून मिळणाऱ्या महसुलात मात्र वाढ झाल्याची दिसून आले. २०१९-२० मध्ये नागपूर विमानतळावर एक हजार २१३ खासगी विमाने व हेलिकॉप्टर्स उतरली व त्यांच्यापासून ४२ लाख १६ हजारांचा महसूल मिळाला होता. एप्रिल २०२० ते मे २१ दरम्यान ७८० खासगी विमाने उतरली व ५१ लाख ९९ हजार रुपयांचा महसूल त्यांच्याकडून प्राप्त झाला.

वर्षनिहाय प्रवाशांची आकडेवारी

वर्ष एप्रिल २०२० ते मे २०२१ : २०१९-२० : २०१८ : २०१७

प्रवासी (शहराबाहेर जाणारे)- ३७,४७७ : १५,३३,४२४ : १३,३७,१८० : १०,४७,१६१

प्रवासी (शहरात येणारे) - ३७,०६६ : १५,२२, ५७७ : १३,३७,८४० : १०,१४,१८८

एकूण महसूल व खर्च

वर्ष : महसूल : खर्च

२०१७ : ५५,१२,१६,६५७ : ५५,५१,३१,९५६

२०१८ : १२०,०४,११,५६९ : ९३,७०,२४,३१३

२०१९-२० : ११८,९७,४०,०८९ : ५४,९३,२०,५२३

एप्रिल २०१९ ते मे २०२० : ४५,७४,००,००० : ४६,९२,००,०००

Web Title: The number of passengers at the airport has dropped by 29 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.