लॉकडाऊनच्या प्रभावाने रुग्णसंख्या घटतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:08 AM2021-03-20T04:08:22+5:302021-03-20T04:08:22+5:30

नागपूर : लॉकडाऊनचा प्रभाव आता दिसून येऊ लागला आहे. ३८०० दरम्यान गेलेली रुग्णसंख्या आता ३२०० वर आली आहे. निर्बंधाचे ...

The number of patients is decreasing due to the effect of lockdown | लॉकडाऊनच्या प्रभावाने रुग्णसंख्या घटतेय

लॉकडाऊनच्या प्रभावाने रुग्णसंख्या घटतेय

Next

नागपूर : लॉकडाऊनचा प्रभाव आता दिसून येऊ लागला आहे. ३८०० दरम्यान गेलेली रुग्णसंख्या आता ३२०० वर आली आहे. निर्बंधाचे आणखी दोन दिवस आहेत. नागरिकांनी संयम व कोरोना प्रतिबंधाचे कठोरतेने नियम पाळल्यास ही रुग्णसंख्या आणखी कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. शुक्रवारी ३२३५ नव्या रुग्णांची भर पडली. मात्र, दैनंदिन मृत्यूच्या संख्येत वाढ झाली. सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच ३५ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १,८५,७८७ तर, मृत्यूची संख्या ४५६३ झाली आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा बारा महिन्यांच्या काळात सर्वाधिक रुग्ण, मृत्यू व चाचण्यांची नोंद सप्टेंबर महिन्यात झाली; परंतु मार्च महिन्यात रुग्णसंख्येचा विक्रम मोडीत निघाला. आता चाचण्यांचा नवा विक्रम स्थापन केला. शुक्रवारी सर्वाधिक १६,०६६ संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या. यात १२,५८७ आरटीपीसीआर, तर ३,४७९ रॅपिड अँटिजन चाचण्यांचा समावेश आहे. आरटीपीसीआरमधून ३१०३, तर अँटिजनमधून १३२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, एकूण चाचण्यांमधून १२,८३१ रुग्ण निगेटिव्ह आले. हा दर ७९.८६ टक्के आहे. शुक्रवारी सर्वाधिक तपासण्या खासगी लॅबमध्ये झाल्या. ६८५३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ५४२९ निगेटिव्ह, तर १४२४ पॉझिटिव्ह आले. मेडिकलच्या प्रयोगशाळेत २२३३ चाचण्यांमधून १५३६ निगेटिव्ह, तर ६९७ पॉझिटिव्ह, मेयोच्या प्रयोगशाळेत १९१९ चाचण्यांमधून १५२६ निगेटिव्ह, तर ३९३ पॉझिटिव्ह, एम्सच्या प्रयोगशाळेत ९४० चाचण्यांमधून ५६० निगेटिव्ह, तर ३८० पॉझिटिव्ह, नीरीच्या प्रयोगशाळेत २७६ चाचण्यांमधून १५२ निगेटिव्ह, तर १२४ पॉझिटिव्ह, तर नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ३६६ चाचण्यांमधून २८१ निगेटिव्ह, तर ८५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

-शहरात २५२४, तर ग्रामीणमध्ये ७०८ रुग्ण

शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. शुक्रवारी शहरात २५२४ रुग्ण, तर ग्रामीणमध्ये ७०८ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये शहरात २३, ग्रामीणमध्ये ९ रुग्णांचे मृत्यू झाले. एकूणच शहरात १४८२७६ रुग्ण व २९३१ मृत्यू, तर ग्रामीणमध्ये ३६५१८ रुग्ण व ८२१ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या ९९३ व मृतांची संख्या ८११वर पोहोचली आहे.

-१२४५ रुग्णांनी केली कोरोनावर मात

फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात रुग्ण बरे होण्याचा दर घसरून ८३.७४ टक्क्यांवर आला आहे. मात्र, मागील सात दिवसांपासून हजारावर रुग्ण बरे होत आहेत. शुक्रवारी १२४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत १,५५,६५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे.

-२५ हजारांवर कोरोनाचे सक्रिय रुग्ण

नागपूर जिल्ह्यात २५,५६९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील १९,१०८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये म्हणजे गृहविलगीकरणात आहेत. ६४६१ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांत व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

: कोरोनाची शुक्रवारची स्थिती

दैनिक चाचण्या : १६०६६

एकूण बाधित रुग्ण : १,८५,७८७

सक्रिय रुग्ण :२५,५६९

बरे झालेले रुग्ण :१,५५,६५५

एकूण मृत्यू : ४५६३

Web Title: The number of patients is decreasing due to the effect of lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.