काेराेना रुग्णांचा आलेख वाढताेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:09 AM2021-03-21T04:09:08+5:302021-03-21T04:09:08+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर/कामठी/कळमेश्वर/हिंगणा/काटाेल/माैदा/उमरेड/नरखेड/कन्हान/रामटेक/कुही : दुसऱ्या टप्प्यात नागपूर ग्रामीणमध्ये काेराेना संक्रमणात झपाट्याने वाढ हाेत आहे. जिल्ह्यात शनिवारी विविध ठिकाणी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर/कामठी/कळमेश्वर/हिंगणा/काटाेल/माैदा/उमरेड/नरखेड/कन्हान/रामटेक/कुही : दुसऱ्या टप्प्यात नागपूर ग्रामीणमध्ये काेराेना संक्रमणात झपाट्याने वाढ हाेत आहे. जिल्ह्यात शनिवारी विविध ठिकाणी काेराेना टेस्ट करण्यात आल्या. त्यात एकट्या सावनेर तालुक्यात २४७ रुग्णांची, तर कामठी तालुक्यात १२२, कळमेश्वर व हिंगणा तालुक्यात प्रत्येकी १०२, काटाेलमध्ये ७०, माैदा तालुक्यात ४३, उमरेडमध्ये ३९, नरखेडमध्ये ३५, कन्हानमध्ये १९, रामटेकमध्ये १९, तर कुही तालुक्यात १३ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. नागरिकांचा हलगर्जीपणा काेराेनाच्या पथ्यावर पडत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले असून, हे संक्रमण कमी करण्यासाठी उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करण्याचे आवाहनही केले आहे.
सावनेर तालुक्यात शनिवारी एकूण २४७ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात सावनेर शहरातील ७१ आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील १७६ रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात १२२ रुग्ण आढळून आले. यात कामठी शहरातील ३७, कामठी शहराच्या छावणी परिसरातील पाच रुग्णांसह तालुक्यातील महादुला येथील २८, रनाळा येथील ११, गुमथळा येथील आठ, येरखेडा येथील आठ, कोराडी येथील सात, भिलगाव येथील सहा तसेच नांदा, पांजरा, बिडगाव व वडोदा प्रत्येकी दोन आणि आजनी, खसाळा, बाभूळखेडा व बिनासंगम येथील प्रत्येकी एक रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आला आहे.
कळमेश्वर तालुक्यातही शनिवारी १०२ रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील १७ आणि तालुक्यातील ८५ रुग्ण आहेत. हिंगणा तालुक्यातील १०२ रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ५,०५४ झाली आहे. यातील ४,०६८ रुग्ण काेराेना मुक्त झाले असून, १०९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी तालुक्यात १,०१४ नागरिकांची टेस्ट करण्यात आली. यातील १०२ जण पाॅझिटिव्ह आढळून आले. यात डिगडोह येथील २६, वानाडोंगरी २३, नीलडाेह १२, टाकळघाट ७, रायपूर ६ तसेच गुमगाव, हिंगणा, मोंढा व इसासनी येथील प्रत्येकी ४, वागदरा येथील ३, सालईदाभा व कान्होलीबारा येथील प्रत्येकी २ आणि आमगाव, सावंगी-देवळी, जुनेवाणी, अडेगाव व गिदमगढ येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
काटाेल तालुक्यानेही शनिवारी सत्तरी पार केली. तालुक्यात ७४ नवीन रुग्ण आढळून आले असून, यात काटाेल शहरातील ५२, तर ग्रामीण भागातील २२ रुग्ण आहेत. काटाेल शहरातील रुग्णांमध्ये धंतोली येथील सात, पंचवटी येथील सहा, गळपुरा येथील चार रुग्ण, धवड लेआऊट, लक्ष्मीनगर व काळे चौक येथील प्रत्येकी तीन, खंते लेआऊट, सरस्वतीनगर, आययूडीपी, फिस्के ले आऊट, संचेती लेआऊट व मेन रोड येथील प्रत्येकी दोन आणि साईमंदिर, कुणबीपुरा, नगरभवन, वडपुरा, मातंगपुरा, रामदेवबाबा लेआऊट, रेल्वेस्थानक परिसर, चांडक लेआऊट, हत्तीखाना, मरामाय नगर, चंडिका चौक, शारदाचौक, भाटपुरा, तारबाजार येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यातील वाढोना येथील पाच, येनवा येथील चार, मरगसूर, गोंडीडिग्रस, कलंबा व कोंढाळी येथील प्रत्येकी दोन, तर इसापूर (खुर्द), खामली, लाडगाव, कारला व आजनगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण काेराेना संक्रमित आहे.
नरखेड तालुक्यातही ३५ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात नरखेड शहरातील सहा, तर ग्रामीण भागातील २९ रुग्ण आहेत. तालुक्यातील थाटूरवाडा येथे आठ, बेलोना येथे पाच, मेंढला येथे पाच, सावरगाव येथे चार, मोवाड येथे तीन, जलालखेडा येथे दाेन व भिष्णूर येथे दाेन रुग्ण आढळून आले आहेत.