दुसरा डाेस घेणार्ऱ्याची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:08 AM2021-05-16T04:08:56+5:302021-05-16T04:08:56+5:30
नागपूर : शहरातील काेराेना नियंत्रण व्हॅक्सिनचा दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शनिवारी लसीचे एकूण १४,४६८ डाेस देण्यात आले. ...
नागपूर : शहरातील काेराेना नियंत्रण व्हॅक्सिनचा दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शनिवारी लसीचे एकूण १४,४६८ डाेस देण्यात आले. यामध्ये दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्या ७,५२३ तर ६,९४५ नागरिकांनी पहिला डाेस घेतला.
शनिवारी ४५ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारीही ४५ प्लस वयाच्या लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू राहणार आहे. आवश्यकतेनुसार लसीचे वायल उपलब्ध झाल्याने लसीकरणाला गती मिळाली आहे. ६० वर्षावरील २,९४४ नागरिकांनी दुसरा डाेस घेतला. दुसरीकडे १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण सध्या राज्य शासनाने थांबविले आहे. यामुळेच संबंधित वयाेगटातील लाभार्थ्यांना लस देण्यात आली नाही. महापालिकेच्या ९६ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जाेशी यांनी सांगितले, मेडिकल काॅलेज व स्व. प्रभाकर दटके महाल आराेग्य केंद्रात केवळ काेव्हॅक्सिनचा दुसरा डाेस लावण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार काेविशिल्डचा पहिला डाेस घेणाऱ्या लाभार्थ्यांना १२ ते १६ आठवड्यानंतरच दुसरा डाेस लावण्यात येणार आहे. ६० पेक्षा अधिक वयाेगटातील लाभार्थ्यांना ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन माेहीम सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत चालविण्यात येणार आहे.