Corona Virus in Nagpur; उपराजधानीतील दीड हजार विमानांची संख्या आता ९० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 10:32 AM2020-04-16T10:32:45+5:302020-04-16T10:33:10+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) विभाग आता केवळ ९० विमानांची निगराणी करीत आहे. लॉकडाऊनपूर्वी ही संख्या दररोज १५०० (आकाशातून जाणाऱ्या विमानांसह) होती.

The number of planes in the sub-capital is now only 90 | Corona Virus in Nagpur; उपराजधानीतील दीड हजार विमानांची संख्या आता ९० वर

Corona Virus in Nagpur; उपराजधानीतील दीड हजार विमानांची संख्या आता ९० वर

Next
ठळक मुद्देकार्गोसह अन्य नॉन शेड्यूल विमानांची ये-जा

वसीम कुरैशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) विभाग आता केवळ ९० विमानांची निगराणी करीत आहे. लॉकडाऊनपूर्वी ही संख्या दररोज १५०० (आकाशातून जाणाऱ्या विमानांसह) होती.

आता विमानतळावर एक-दोन दिवसाआड वैद्यकीय उपकरणांसह काही अत्यावश्यक सामग्री आणणारी कार्गो, वैद्यकीय सेवेची उड्डाणे आणि तांत्रिक विमाने (इंधन भरण्यासाठी उतरणारी कार्गो विमाने) येत आहेत. एकू ण ९० उड्डाणांमध्ये समाविष्ट झालेल्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त आकाशातून जाणारी विदेशी उड्डाणे आहेत. लॉकडाऊनदरम्यान भारतीय वायुसेना आणि नागपूर विमानतळावरून नवीन वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी उड्डाणे होत आहेत. याशिवाय डिफेन्ससंबंधित कार्गोची ये-जा सुरू आहे.
उल्लेखनीय असे की, कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाने अनेक देशांनी विमानांच्या उड्डाणांवर प्रतिबंध लावला आहे. याच कारणाने नागपूर रडार नियंत्रण भागातून जाणाºया उड्डाणांच्या संख्येत घट झाली आहे. आकाशातून जाणारी विमाने नागपूर रडार नियंत्रण भागातून जातात तेव्हा त्याच्या निगराणीसाठी एएआयला महसूल मिळतो. एकीकडे विमानतळावर उड्डाणे पूर्णपणे बंद असल्याने मिहान इंडिया लिमिटेडला मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर भारतीय विमानतळ प्राधिकरणाला आकाशातून जाणारी विमाने कमी झाल्याने तोटा होत आहे. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगकरिता हवाई वाहतूक नियंत्रण टॉवर आणि रडार टॉवरमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अर्ध्यावर आणली आहे.

 

Web Title: The number of planes in the sub-capital is now only 90

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.