आठवडाभरात विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:08 AM2020-12-22T04:08:54+5:302020-12-22T04:08:54+5:30

नागपूर : कोरोनाच्या धास्तीमुळे ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याकडे पाठ दाखविली होती, तेच पालक आता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला लागले ...

The number of students doubled in a week | आठवडाभरात विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट

आठवडाभरात विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट

Next

नागपूर : कोरोनाच्या धास्तीमुळे ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याकडे पाठ दाखविली होती, तेच पालक आता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला लागले आहे. ग्रामीण भागातील शाळा १४ डिसेंबरपासून सुरू झाल्या आणि आठवडाभरात विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट झाली. सध्या ४ तास नियमित शाळा भरत आहे.

जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळा, १४ डिसेंबरपासून उघडल्या. १ लाख २८ हजार विद्यार्थी संख्या असतानाही पहिल्या दिवशी केवळ १६ हजारच विद्यार्थी शाळेत पोहचले. १० महिन्यानंतर शाळा सुरू होत असल्याने आणि कोरोना पूर्णपणे गेला नसल्याने जिल्ह्यातील यंत्रणेत धाकधूक होती. पण शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वीकारलेल्या आव्हानामुळे हळूहळू विद्यार्थी शाळेत येऊ लागले आहेत. पालकही शाळांमध्ये केलेल्या उपाययोजना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू लागले आहेत.

- जिल्ह्यात आजच्या घडीला ९ ते १२ वीच्या ६४८ शाळा सुरू आहेत.

- ३०,५३८ विद्यार्थी शाळेत पोहचले होते.

४,१७५ शिक्षकांकडून अध्यापनाचे काम सुरू आहे.

Web Title: The number of students doubled in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.