ग्रामीण भागात बाधितांच्या संख्येत घटतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:08 AM2021-06-02T04:08:27+5:302021-06-02T04:08:27+5:30

काटोल/कुही/कळमेश्वर/हिंगणा/उमरेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार १३ तालुक्यात ३,६८६ चाचण्यापैकी ...

The number of victims is declining in rural areas | ग्रामीण भागात बाधितांच्या संख्येत घटतेय

ग्रामीण भागात बाधितांच्या संख्येत घटतेय

Next

काटोल/कुही/कळमेश्वर/हिंगणा/उमरेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार १३ तालुक्यात ३,६८६ चाचण्यापैकी ५७ (१.५४ टक्के) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत १,४२,०५३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १,३७,२६२ कोरोनामुक्त झाले तर, २२९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २,०९७ इतकी आहे.

कळमेश्वर तालुक्यात एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात एकाची रुग्णांची नोंद नाही. बाधित रुग्ण कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील आहेत. कुही तालुक्यात १६० जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. तीत दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वेलतूर व साळवा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. काटोल तालुक्यात २५२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरात २ रुग्ण तर कचारी सावंगा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एका रुग्णाची नोंद झाली.

हिंगणा तालुक्यात २७० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे ४, कान्होलीबारा (३), गुमगाव, उखळी, इसासनी, हिंगणा, रायपूर, डिगडोह व किन्ही धानोली येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ११,९२५ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ११,०२४ कोरोनामुक्त झाले तर, २७२ रुग्णांचा मृत्यू झाला. उमरेड शहराला कोरोना चाचणीत पहिल्यांदा भोपळा मिळाला. ग्रामीण भागात मात्र ३ रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत उमरेड तालुक्यात ७,०५५ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, यामध्ये शहरातील ३,५८७ तसेच ग्रामीण भागातील ३,४६८ रुग्णांचा समावेश आहे. १३८ रुग्णांचा मृत्यू झाला. यात शहरातील ७५ तर ग्रामीण भागातील मृत्यूसंख्या ६३ आहे. कोरोनामुक्त रुग्णांची आकडेवारीसुद्धा तालुक्यात समाधानकारक आहे. आतापर्यंत ६,७६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये शहरातील ३,४९० तसेच ग्रामीण भागातील ३,२७८ रुग्णांचा समावेश आहे. सध्या तालुक्यात १४९ रुग्ण औषधोपचार घेत आहेत. यापैकी शहरात २२ तर ग्रामीण भागातील १२७ आहेत.

कोविड सेंटरमध्ये दोन रुग्ण

उमरेडच्या कोविड सेंटरमध्येसुद्धा आठवडाभरापासून रुग्णांची संख्या रोडावली आहे. मंगळवारी केवळ दोन रुग्ण याठिकाणी औषधोपचार घेत आहेत. सोमवारी एकूण चार रुग्ण होते. यापैकी दोघांना सुटी देण्यात आली. रुग्णसंख्या कमी झाल्याने कोविड सेंटरमधील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, वॉर्डबॉय आदींना दिलासा मिळाला आहे.

Web Title: The number of victims is declining in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.