मास्क न वापरता फिरणाऱ्यांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:13 AM2021-09-15T04:13:05+5:302021-09-15T04:13:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. असे असतानाही मास्क न वापरता बेजबाबदारपणे फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. असे असतानाही मास्क न वापरता बेजबाबदारपणे फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एनडीएस पथकाने मंगळवारी अशा ३९ नागरिकांवर कारवाई करून १९,५०० रुपयांचा दंड वसूल केला.
शोध पथकांनी १३ सप्टेंबरपर्यंत मास्क न वापरणाऱ्या ४०,२९५ नागरिकांकडून १ कोटी ८५ लाख ६ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी मास्क वापरून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असे आवाहन मनपाने केले आहे.
...
तीन प्रतिष्ठानांवर कारवाई
उपद्रव शोध पथकाने मंगळवारी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने तीन प्रतिष्ठानांवर कारवाई केली. २५ हजार रुपये दंड वसूल केला. ४२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. हनुमान नगर झोनमधील एका व मंगळवारी झोनमधील दोन दुकानांवर कारवाई करून २५ हजार रुपये दंड वसूल केला.