कारागृहात तरुण कैद्यांची संख्या वाढतेय - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:07 AM2020-12-29T04:07:59+5:302020-12-29T04:07:59+5:30
गंभीर गुन्ह्यात सहभाग - कारागृहात राहून सराईत बनतात - लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कारागृहाच्या भेसूर भिंतीआड गुन्हेगारांची संख्या ...
गंभीर गुन्ह्यात सहभाग - कारागृहात राहून सराईत बनतात -
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कारागृहाच्या भेसूर भिंतीआड गुन्हेगारांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. विशेष म्हणजे, या गुन्हेगारांमध्ये तरुण गुन्हेगारांचे वाढणारे प्रमाण चिंताजनक आहे. एकूण गुन्हेगारांच्या सरासरीची तुलना केल्यास ५५ टक्क्यांपेक्षा जास्त गुन्हेगार तरुण वयोगटातील अर्थात १८ ते ३५ वयोगटातील आहेत. तुलनेत प्राैढ गुन्हेगारांची संख्या कमी आहे.
हत्या, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, हाणामारी, चोरी, घरफोडी आणि विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपींचे प्रमाण जास्त आहे. या गुन्ह्यात शिक्षा झालेले किंवा न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या गुन्हेगारांची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे, शिक्षा ठोठावलेल्या आणि गुन्ह्यात न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणातील आरोपींची संख्याही तरुण गुन्हेगारांचीच जास्त आहे.
कारागृहात अट्टल गुन्हेगारांची संख्या जास्त असते. त्यांच्या सान्निध्यात आल्याने चुकून गुन्हेगारीचा ठप्पा लागलेले नवखे गुन्हेगारही नंतर सराईत होतात. त्याचमुळे कारागृहातून बाहेर आल्यानंतर बहुतांश गुन्हेगारांच्या वर्तनात सुधार होण्याऐवजी निर्ढावलेपणा वाढतो, असे सार्वत्रिक मत आहे.
---
((कोट))
कारागृहाला सुधारगृह बनविण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या गुन्हेगारांच्या वर्तनात सुधार व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न असतात.
अनुपकुमार कुमरे
कारागृह अधीक्षक, नागपूर
----
गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेले आरोपी
वय १८ ते ३०
पुरुष - १८८, महिला - ०४
वय ३१ ते ५०
पुरुष - २७८, महिला -१२
वय ५० पेक्षा जास्त
पुरुष - १९९, महिला -०५
---
न्यायाधीन बंदी
वय १८ ते ३०
पुरुष - ८३१, महिला - ०२३
वय ३१ ते ५०
पुरुष - ५९४, महिला - ०३९
वय ५० पेक्षा जास्त
पुरुष - १२०, महिला - ०६
कारागृहातील एकूण कैदी - २,२९९
पॅरोलवर बाहेर गेलेले कैदी - ५२२
---
कोणत्या गुन्ह्यात प्रमाण जास्त
हत्या, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, हाणामारी, विनयभंग, जबरी चोऱ्या आदी अजामिनपात्र प्रकरणातील गुन्हेगारांची संख्या कारागृहात जास्त आहे.
---