स्लम भागातील नागरिकांचा लसीकरणाला नन्ना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:09 AM2021-06-16T04:09:03+5:302021-06-16T04:09:03+5:30

४५ वर्षांवरील ५.३० लाख नागरिकांना पहिला डोस : मनपा प्रशासनाचा जनजागृतीवर जोर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

Nunna to vaccinate slum dwellers! | स्लम भागातील नागरिकांचा लसीकरणाला नन्ना !

स्लम भागातील नागरिकांचा लसीकरणाला नन्ना !

Next

४५ वर्षांवरील ५.३० लाख नागरिकांना पहिला डोस : मनपा प्रशासनाचा जनजागृतीवर जोर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे जाहीर केल्यानंतर, शहरात केवळ ११ हजार १४१ नागरिकांना लस देण्यात आली. मात्र, त्यानंतर लसीचा निर्माण झालेला तुटवडा बघता, या वयोगटाचे लसीकरण बंद करण्यात आले. आता केवळ ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जात आहे. त्यामुळे आधी दररोज १५ ते १६ हजार लाभार्थींना डोस दिले जात होते. परंतु, मागील काही दिवसांत हा आकडा दोन ते अडीच हजारांवर आला आहे. नागपूर शहरात आतापर्यंत ५ लाख ३० हजाार लोकांना पहिला डोस दिला आहे. दुसरा डोस १ लाख ८० हजार लोकांना देण्यात आला आहे.

...

शहरात सर्वांत कमी लसीकरण झालेली केंद्रे

केंद्राचे नाव आतापर्यंत लसीकरण

- गरीब नवाज नगर आरोग्य केंद्र - ३५

- जयताळा प्रा. आरोग्य केंद्र (ब) - ४८

- सोमलवाडा प्रा. आरोग्य केंद्र - २०४

- कॉटन मार्केट प्रा. आरोग्य केंद्र - २३९

- समाज भवन जयताळा - १०१

- राहुल कॉम्प्लेक्स - ३३६

...

शहरात सर्वांत जास्त लसीकरण झालेली केंद्रे

केंद्राचे नाव आतापर्यंत लसीकरण

- इंदिरा गांधी रुग्णालय - २४,३२४

- आयसोलेशन - १६,६९९

- के. टी. नगर प्रा. आरोग्य केंद्र - १६,१२९

- विमा रुग्णालय - १४,११६

- पोलीस हॉस्पिटल - १०,१२२

.....

लसीकरण कमी होण्यामागे जनजागृतीचा अभाव

नागपूर शहरातील स्लम भागात व मनपाच्या काही झोनमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण कमी आहे. यामागे जगजागृतीचा अभाव व नागरिकांत असलेली उदासीनता हे या मागील प्रमुख कारण आहे.

...

५.३० लाख लोकांनी घेतला पहिला डोस

नागपूर शहराची लोकसंख्या २८ लाखांहून अधिक आहे. यातील ५ लाख ३० हजार लोकांनी पहिला डोस घेतला आहे, तर १ लाख ८० हजार लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. शहरात ४५ वर्षांवरील जवळपास १ लाखाहून अधिक लोकांनी पहिला डोस घेतला नाही, असा अंदाज आहे.

....

अनेक केंद्र बंद

नागपूर शहरात लसीकरणाला गती देण्यासाठी २०८ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आल्यानंतर केंद्रावरील गर्दी कमी झाल्याने ११३ केंद्र तूर्त बंद आहेत.

.....

‘लसीकरण आपल्या दारी’ मोहीम

४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महापालिकेने ‘लसीकरण आपल्या दारी’ मोहीम हाती घेतली आहे. सोबतच विविध उपक्रम राबविले जात आहेत. जनजागृती केली जात आहे. सेवाभावी संस्थांची मदत घेतली जात आहे. यात रोटरी ईशान्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मनपा कर्मचारी, भोपाळ इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप, समूह संघटक, महिला बचत गट व झोनस्तरावरील कर्मचारी आदींचा समावेश आहे.

राम जोशी, अतिरिक्त आयुक्त मनपा

Web Title: Nunna to vaccinate slum dwellers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.