अपघातात परिचारिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:07 AM2021-06-04T04:07:53+5:302021-06-04T04:07:53+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वानाडाेंगरी : भरधाव ट्रकचालकाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या परिचारिकेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
वानाडाेंगरी : भरधाव ट्रकचालकाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या परिचारिकेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना नागपूर-वर्धा मार्गावरील डाेंगरगाव परिसरात गुरुवारी (दि.३) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
निलू मूलचंद काेसमे (२०, रा. गाेंडामाेहाडी, जि. गाेंदिया) असे मृत परिचारिकेचे नाव असून, ती डाेंगरगाव येथील गायकवाड पाटील काेविड रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत हाेती व तिथेच वसतिगृहात राहत हाेती. गुरुवारी (दि.३) ती रुग्णालयातील कर्मचारी आशिष देवानंद जांभुळकर (२४) याच्यासह एमएच-३६/एएच-६६६३ क्रमांकाच्या दुचाकीने काही कामानिमित्त नागपूर येथे जायला निघाली. दरम्यान, डाेंगरगाव बसथांबा येथे जात असताना जुना बंद टाेलनाक्यावर यू-टर्न घेताना नागपूरकडून बुटीबाेरीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या एमएच-१६/सीसी-७७९७ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेली निलू ट्रकच्या चाकाखाली आल्याने गंभीररीत्या दुखापत हाेऊन घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक आशिष किरकाेळ जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच हिंगणा पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. पाेलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, त्यास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पाेलीस निरीक्षक सारिन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात हिंगणा पाेलीस करीत आहेत.