डॉक्टर नव्हे येथे नर्स तपासते रुग्ण; मनपा आयसोलेशन रुग्णालयातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 04:21 PM2021-10-22T16:21:42+5:302021-10-22T17:06:47+5:30

मनपाच्या आयसोलेशन हॉस्पिटलच्या नुतनीकरणावर नुकताच लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. खाटांची संख्याही वाढवून ४० करण्यात आली. परंतु रुग्णसेवेत जराही बदल झालेला नाही. रुग्णालयात ३ डॉक्टर कार्यरत असताना रात्री एकही डॉक्टर राहत नाही.

The nurse examines the patient, not the doctor; | डॉक्टर नव्हे येथे नर्स तपासते रुग्ण; मनपा आयसोलेशन रुग्णालयातील प्रकार

डॉक्टर नव्हे येथे नर्स तपासते रुग्ण; मनपा आयसोलेशन रुग्णालयातील प्रकार

Next
ठळक मुद्देमनपा रुग्णालयांचा वाली कोण?

सुमेध वाघमारे

नागपूर : महानगरपालिकेचा २४ तास रुग्णसेवेत असलेल्या आयसोलेशन रुग्णालयात रात्री डॉक्टर राहत नसल्याने नर्सवर रुग्ण तपासण्याची वेळ येते. रुग्णाला हात न लावता दूर बसवून ठेवत लक्षणावर औषधीही देते. रुग्णाचा जीवाशी खेळणारा हा धक्कादायक प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. नर्सकडूनच रुग्णांची तपासणी होत असेल तर मनपाच्या या रुग्णालयांवर लाखो रुपयांचा खर्च करण्याचे कारण काय, असा प्रश्न आहे.

मनपा रुग्णालयातील आरोग्य सेवांची भीषण दुरावस्था व विषमतेला घेऊन गांधीनगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयाला मंगळवारी भेट दिली असता ११० खाटांच्या या रुग्णालयात रात्री १० वाजतानंतर मुख्य प्रवेशद्वारावर चक्क कुलूप लावले जात असल्याचे वास्तव पुढे आले. परंतु हीच स्थिती मनपाच्या इतरही रुग्णालयात आढळून आली. गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पिटलला भेट दिली असता येथेही डॉक्टर नसल्याचे दिसून आले. परिचारिकेने रुग्णाला दूर ठेवलेल्या बाकावर बसण्यास सांगून काय होत आहे विचारत, स्वत:च पाच-सहा गोळ्या व ‘ओआरएस’चे दोन पॅकेट देऊन आणि रजिस्टरवर तशी नोंद करून पाठवून दिले. रात्री येथे ना रुग्णाची तपासणी होत, ना काळजी घेतली जात असल्याचे चित्र आहे.

- नुतनीकरणावर लाखो रुपयांचा खर्च

मनपाच्या आयसोलेशन हॉस्पिटलच्या नुतनीकरणावर नुकताच लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. टाईल्सपासून ते फर्निचरपर्यंत बदल करण्यात आले. खाटांची संख्याही वाढवून ४० करण्यात आली. परंतु रुग्णसेवेत जराही बदल झालेला नाही. रुग्णालयात तीन डॉक्टर कार्यरत असताना रात्री एकही डॉक्टर राहत नाही. सुत्रानूसार, येथील एक महिला डॉक्टर आजारी आहे. तिच्या जागेवर कोणी दुसरा डॉक्टर मनपा प्रशासनाने दिले नसल्याचे समजते.

-३२४ खाटांचे हे रुग्णालय कागदावरच

२०१९ मध्ये मनपाचे आयसोलेशन रुग्णालय 'स्वीस चॅलेंज' पध्दतीने अत्याधुनिक स्वरूपात बदलून ३२४ खाटांचे होणार होते. पॉलीट्रामा आणि संसर्गजन्य आजाराचे ते मुख्य केंद्र असणार होते. महासभेत यासंदभार्तील प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहासमोरही ठेवण्यात आला होता. परंतु पुढे याचे काय झाले, याची माहिती कोणालाच नाही.

Web Title: The nurse examines the patient, not the doctor;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.