गाेंडखैरी येथे परिचारिका दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:08 AM2021-05-15T04:08:14+5:302021-05-15T04:08:14+5:30
गाेंडखैरी : स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात जागतिक परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी काेराेना संक्रमण काळात स्वत:चा ...
गाेंडखैरी : स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात जागतिक परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी काेराेना संक्रमण काळात स्वत:चा व कुटुंबीयांचा जीव धाेक्यात टाकून रुग्णांना अविरत सेवा प्रदान करणाऱ्या परिचारिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सुश्रुषा शास्त्राच्या संस्थापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिन जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जात असल्याने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्राथमिक आराेग्य केंद्रातील परिचारिकांचा गाैरवही करण्यात आला. कार्यक्रमाला सामुदायिक आरोग्य अधिकारी डाॅ. अपेक्षा गाणार, वैद्यकीय अधिकारी डाॅ. कृणाल वासनिक, मार्गारेट थाॅमस, सारंग बेले, बाळासाहेब चोपडे, आरोग्यसेविका माधुरी देशपांडे, पुष्पा रामटेके, रेखा अत्रे, कल्पना शेवाळे, रोशन भोंगळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात अतिथींनी फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या जीवन कार्यासाेबतच आधुनिक व काेराेना संक्रमण काळात सेवा प्रदान करणाऱ्या परिचारिकांच्या कार्यावर भाषणातून प्रकाश टाकला.