नरखेड येथे परिचारिका दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:09 AM2021-05-14T04:09:35+5:302021-05-14T04:09:35+5:30
नरखेड : शहरातील ग्रामीण रुग्णालय तसेच तालुक्यात प्राथमिक आराेग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये जागतिक परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. ...
नरखेड : शहरातील ग्रामीण रुग्णालय तसेच तालुक्यात प्राथमिक आराेग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये जागतिक परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. या प्रत्येक कार्यक्रमात परिचारिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचा गाैरव करण्यात आला.
या कार्यक्रमात परिचारिका जयश्री सावरकर, वंदना ईश्वरकर, वर्षा साजरे, निर्मला खेडकर, विद्या धुर्वे, जयश्री डाबरडे, सतीश मोहाडी, वैशाली चणकापुरे, सुलभा गायधने, दीपा गवळी, वैभवी शेंदरे, नंदा रामटेके, मयूरी बोरकर, रंजनी लोखंडे यांचा गाैरव करण्यात आला. कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, माजी जिल्हा परिषद सदस्य देवका बोडखे, माजी पंचायत समिती सदस्य रश्मी आरघोडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. हरिष महंत, डाॅ. प्रशांत वेखंडे, डाॅ. देशमुख, डाॅ. देवेंद्र बारई, डाॅ. कविता भगत, वैभव दळवी, अनिकेत सावंत, सतीश रेवतकर, पाेलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे उपस्थित हाेते.