लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये परिचारिकांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:08 AM2021-04-24T04:08:05+5:302021-04-24T04:08:05+5:30
लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये परिचारिकांसह अन्य कर्मचाऱ्यांवर अन्याय व अत्याचाराची प्रकरणे निरंतर वाढत असल्याचा महासंघाचा आरोप आहे. सेवाभरतीवेळी पाच वर्षांनंतर ...
लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये परिचारिकांसह अन्य कर्मचाऱ्यांवर अन्याय व अत्याचाराची प्रकरणे निरंतर वाढत असल्याचा महासंघाचा आरोप आहे. सेवाभरतीवेळी पाच वर्षांनंतर सेवा नियमित करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले होते. त्यानंतरही केवळ अल्प वेतन देऊन शोषण करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करणे, समान काम समान वेतन लागू करणे, वार्षिक वेतनात वाढ करणे, कोविड भत्ता लागू करणे, नियमित सुटी देणे, मानसिक शोषण बंद करणे आणि शोषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आंदोलनकर्त्यांनी मागणी आहे. व्यवस्थापनाने आंदोलन बंद करण्याचा प्रयत्न केला आणि धमकी दिल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. यासंदर्भात त्यांनी हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून, जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे.
याप्रसंगी अरुण गाडे, संजय सायरे, प्रमिला गोरले, आशा बांगरे, ऊर्वशी, सेविका मून आदी परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी डीन कार्यालयासमोर पाच-पाचच्या समूहाने बसून आंदोलन केले. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.