नॉयलॉन मांजाला ‘काट’
By Admin | Published: December 31, 2015 03:04 AM2015-12-31T03:04:58+5:302015-12-31T03:04:58+5:30
नागरिकांसह पक्ष्यांच्या जीविताला असलेला धोका विचारात घेता उच्च न्यायालयाने नॉयलॉन मांजाचा वापर व विक्री करण्यावर बंदी करण्याचे निर्देश दिले आहेत.
नागपूर : नागरिकांसह पक्ष्यांच्या जीविताला असलेला धोका विचारात घेता उच्च न्यायालयाने नॉयलॉन मांजाचा वापर व विक्री करण्यावर बंदी करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असतानाही शहरात या मांजाचा सर्रास वापर व विक्री सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या निर्देशानुसार शहर तहसीलदार एस.जी.समर्थ यांनी शहरातील पतंग विक्रे त्यांच्या प्रतिष्ठानांवर धाडी घालून ६० हजारांचा मांजा जप्त केला आहे. यापुढे नॉयलॉन मांजाची विक्री करताना आढळल्यास विक्रे त्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मकरसंक्रांतीचे पर्व आकाशात पतंग उडवून साजरे केले जाते. त्यामुळे एक-दीड महिना शहरात सर्व भागात पतंग उडवणाऱ्यांची धमाल सुरू असते. परंतु यासाठी बंदी असलेल्या नॉयलॉन मांजाचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे मांजात अडक ल्याने अनेकजण जखमी होतात. वेळप्रसंगी काहींना जीव गमवावा लागतो. मागील काही वर्षात अशा घटना वाढल्या आहेत. तसेच पतंगाच्या मांजामुळे पक्षी जखमी होतात. अनेकदा त्यांनाही आपला जीव गमवावा लागतो. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने नॉयलॉन मांजाचा वापर व विक्री करण्यावर बंदी घातली आहे. असे असतानाही अनेक विक्रे ते या मांजाची विक्री करीत असल्यासंदर्भात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत त्यांनी नॉयलॉन मांजा जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार समर्थ यांनी शहरातील मांजा विक्रे त्यांच्या प्रतिष्ठानावर धाडी घातल्या. ही कारवाई अशीच सुरू राहणार असून नॉयलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)