सामाजिक व आर्थिक परिवर्तनाकरिता ओबीसींनी सत्ताधीश व्हावे - महादेव जानकर

By आनंद डेकाटे | Published: June 26, 2023 04:35 PM2023-06-26T16:35:28+5:302023-06-26T16:35:38+5:30

संवाद परिषद शिबीर

OBCs should be in power for social and economic transformation - Mahadev Jankar | सामाजिक व आर्थिक परिवर्तनाकरिता ओबीसींनी सत्ताधीश व्हावे - महादेव जानकर

सामाजिक व आर्थिक परिवर्तनाकरिता ओबीसींनी सत्ताधीश व्हावे - महादेव जानकर

googlenewsNext

नागपूर : जोपर्यंत सत्तेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत आपले हक्क आणि अधिकार आपल्याला मिळणार नाही.. त्यामुळे ओबीसींनी आता सत्तेचे स्वप्न पाहिले पाहिजे. सामाजिक व आर्थिक परिवर्तनाकरिता सत्ताधीश व्हावे, असे आवाहन माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी येथे केले.

सत्यशोधक समाज स्थापनेच्या १५० व्या शतकोत्तर सुवर्ण वर्ष महोत्सवी वर्षानिमित्त, तथा आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, व विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने एक दिवशीय संवाद परिषदेचे आयोजन सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. विदर्भ तेली समाज महासंघाचे राज्य संघटक कृष्णाजी बेले हे अध्यक्ष स्थानी होते. सेवा दल महिला महाविद्यालयाचे अध्यक्ष संजय शेंडे हे स्वागताध्यक्ष होते.

राष्ट्रीय समाज एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्रीसागर हे उद्घाटक होते. राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे अध्यक्ष गोपाल भारती, सत्यशोधक प्रबोधनकार अरविंद माळी, सुशीलाताई मोराळे प्रमुख अतिथी हाेते. तसेच उमेश कोराम,अनिल कुमार, इंजिनियर हमीद, शुभांगी घाटोळे, मिस्टर अफजल, हरीकिशनदादा हटवार, प्राध्यापक राहुल मून, अरुण गाडे संजय रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन एड. रमेश पिसे यांनी केले. विलास काळे यांनी भूमिका मांडली. तर सुधीर सुर्वे यांनी आभार मानले.

फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवा

प्रमुख वक्ते म्हणून अरविंद माळी म्हणाले, सामाजिक क्रांती शिवाय राजकीय परिवर्तन अशक्य आहे. याकरता आपल्या स्वतःमध्ये आमुलाग्र परिवर्तन आपल्याला घडवून आणावा लागेल. तसेच फुले, शाहू आंबेडकरांची विचारधारा जनमाणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल.

Web Title: OBCs should be in power for social and economic transformation - Mahadev Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.