जिल्हा बँकांना अर्थसाहाय्य शासनाच्या अटीवर आक्षेप

By admin | Published: June 25, 2014 01:17 AM2014-06-25T01:17:26+5:302014-06-25T01:17:26+5:30

नागपूर, वर्धा व बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अर्थसहाय्य करण्यासाठी राज्य शासनाने ठेवलेल्या एका अटीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज, मंगळवारी आक्षेप घेण्यात आला.

Objection to the terms of the government to finance the district banks | जिल्हा बँकांना अर्थसाहाय्य शासनाच्या अटीवर आक्षेप

जिल्हा बँकांना अर्थसाहाय्य शासनाच्या अटीवर आक्षेप

Next

नागपूर : नागपूर, वर्धा व बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अर्थसहाय्य करण्यासाठी राज्य शासनाने ठेवलेल्या एका अटीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज, मंगळवारी आक्षेप घेण्यात आला. उच्च न्यायालयाने बँकांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतरच व रिझर्व्ह बँकेने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करून परवाना देण्याची तयारी दर्शविल्यावरच अर्थसहाय्य वितरित करण्यात यावे, अशी शासनाची वादग्रस्त अट आहे.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्यासमक्ष या प्रकरणावर सुनावणी झाली असता, जिल्हा बँकांचे वकील अ‍ॅड. मुकेश समर्थ यांनी शासनाच्या अटीकडे लक्ष वेधले. यानंतर न्यायालयाने शासनाला वादग्रस्त अटीबाबत एक आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देऊन सुनावणी तहकूब केली. तिन्ही जिल्हा बँका आर्थिक अडचणींमुळे ४ टक्के भांडवल पर्याप्ततेची (सीआरएआर) अट पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे, रिझर्व्ह बँकेने गेल्या ९ मे रोजी ‘बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट-१९४९’च्या कलम २२(५)अन्वये तिन्ही बँकांचे बँकिंग परवाना अर्ज फेटाळून बँकिंग व्यवहार थांबविण्याचे आदेश दिले आहेत. याविरुद्ध बँकांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने रिझर्व्ह बँकेच्या आदेशावर अंतरिम स्थगिती दिली आहे. १९ जूनच्या निर्णयान्वये राज्य शासन तिन्ही बँकांना ३१९.५४ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करणार आहे.
नागपूर बँकेला ९२.९४ कोटी, वर्धा बँकेला १०२.५६ कोटी तर बुलडाणा बँकेला १२४.०४ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Objection to the terms of the government to finance the district banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.