मिहान रिंग रोडच्या रस्त्यात अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:11 AM2021-03-13T04:11:32+5:302021-03-13T04:11:32+5:30
वसीम कुरेशी नागपूर : मिहान परिसरात नॉन एसईझेड क्षेत्रात आऊटर रिंग रोडला जोडणाऱ्या मार्गाचे काम सध्या मिहानजवळ रखडले आहे. ...
वसीम कुरेशी
नागपूर : मिहान परिसरात नॉन एसईझेड क्षेत्रात आऊटर रिंग रोडला जोडणाऱ्या मार्गाचे काम सध्या मिहानजवळ रखडले आहे. चार शेतकऱ्यांच्या जागेमुळे तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. आता महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (एमएडीसी) कायद्याचा आधार घेऊन यातून मार्ग काढण्याच्या तयारीत आहे.
हिंगण्याचा लांबचा फेरा करून यावे लागत असल्याने मिहानजवळूनच मार्ग तयार केला जावा, अशी मागणी १२.५ टक्के विकसित जमीनधारक प्रकल्पग्रस्तांनी केली होती. यानुसार, मिहानपासून आऊटर रिंग रोडपर्यंत सुमारे तीन किलोमीटरचा मार्ग तयार करण्यात आला आहे. सूत्रांच्या मते, प्रकल्पग्रस्तांची मागणी हा निव्वळ बहाणा आहे. हा मार्ग व्हावा, ही एका मोठ्या आयुर्वेदिक कंपनीच्या हिताचे आहे. मिहानपासून या मार्गाचे सुमारे ४०० मीटरचे काम खोळंबले आहे.
...
रुंदीकरण कोठेवाडापर्यंत
मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रा(एसईजेड)पासून आऊटर रिंग रोडला जोडणाऱ्या जुन्या एकेरी मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. यावेळी राज्याच्या बजेटमध्ये मिहानसाठी कसलेही प्रावधान नाही. यामुळे काम रेंगाळणार असे दिसत आहे. १.२० किलोमीटर लांबीच्या या मार्गावर फक्त कस्टम चेकसोबत एंन्ट्री व एक्झिट असेल. या मार्गाने फक्त कर्मचारीच ये-जा करू शकतील.