‘राष्ट्रीय मतदार दिवसा’निमित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:08 AM2021-01-22T04:08:39+5:302021-01-22T04:08:39+5:30

नागपूर : मतदान प्रक्रियेमध्ये युवा मतदारांचा सहभाग वाढावा व त्यांच्यात मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे २५ जानेवारी ...

On the occasion of 'National Voters' Day' | ‘राष्ट्रीय मतदार दिवसा’निमित्त

‘राष्ट्रीय मतदार दिवसा’निमित्त

Next

नागपूर : मतदान प्रक्रियेमध्ये युवा मतदारांचा सहभाग वाढावा व त्यांच्यात मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे २५ जानेवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या निमित्त नवीन मतदारांना ओळखपत्र वाटप, उत्कृष्ट मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) यांचा मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येईल. मतदान करणे व मतदार यादीत नाव नोंदणी करण्याच्या विषयावर पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. ‘सभी मतदाता बनें : सशक्त, सतर्क, सुरक्षित एवं जागरुक’ अशी अकराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाची थिम निश्चित करण्यात आली आहे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी कळविले आहे.

-----------------------

ध्वजदिन निधीसाठी हंसोती यांच्याकडून योगदान

नागपूर : शहीद सैनिकांच्या कुटुंबीयाचे पुनर्वसन, माजी सैनिक आणि दिव्यांग सैनिकांच्या पुनर्वसनासाठी सशत्र सेना ध्वजदिन निधी खर्च करण्यात येतो. या अनुषंगाने शहरातील धरमपेठ ६५ (खरे टाऊन) येथील ज्येष्ठ नागरिक सुबोध हंसोती यांनी २० जानेवारीला ध्वजदिन निधीसाठी ५० हजार रुपयांचा धनादेश जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सुपूर्द केला.

ध्वजदिन निधीतील योगदानामुळे सैनिकांचे मनोबल उंचावण्यासोबतच देशरक्षण करीत असताना आपल्या पाठीशी संपूर्ण समाज उभा आहे, अशी भावना सैनिकांच्या मनात तयार होण्यास मदत होते. हंसोती कुटुंब वयोवृध्द असले तरी विचाराने मात्र तरुणच आहेत, असे विचार यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांनी व्यक्त केले.

Web Title: On the occasion of 'National Voters' Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.