याेग दिनानिमित्त याेगासने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:06 AM2021-06-22T04:06:51+5:302021-06-22T04:06:51+5:30
खापा : स्थानिक पाेलीस ठाणे येथे जागतिक याेग दिन साजरा करण्यात आला. यावेळी पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक याेगासने ...
खापा : स्थानिक पाेलीस ठाणे येथे जागतिक याेग दिन साजरा करण्यात आला. यावेळी पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक याेगासने केली. काेराेना महामारीच्या काळात व्यक्ती बंदिस्त झाला आहे. शरीरात स्थुलपणा वाढला आहे. नियमित व्यायाम नसल्याने शरीरात आजारांनी प्रवेश केला आहे. यामुळे शरीर निराेगी ठेवण्यासाठी याेगाभ्यास करणे गरजेचे आहे, असे मत ठाणेदार अजय मानकर यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पाेलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे, पाेलीस कर्मचारी यादव हाेनराव, विजय बारई, संजय वानखडे, दीपक मानवटकर, अशाेक सिंह ठाकूर, प्रमाेद बन्साेड, संजय दशमवार, मंगेश म्हैसने, पंकज गाडगे, भारती चामट, गीता तायडे, शुभांगी पुसाम, संजय वानखडे, गंगाधर काकडे आदी उपस्थित हाेते.
....
पतंजली याेगपीठ पारशिवनी
पारशिवनी : पतंजली याेगपीठ पारशिवनी तालुकाच्या वतीने तकीया माराेती मंदिर सभागृहात जागतिक याेग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा योग प्रचारक अंगद भारद्वाज, तालुका प्रभारी डॉ. प्रमोद भड, योग शिक्षक प्रशांत भोयर, नगरसेविका अनिता भड, दिवाकर भोयर, सिंधू चव्हाण, विशेष धोटे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. अंगद भारद्वाज यांनी प्राणायामाचे विविध प्रकार व त्यांचे फायदे तसेच व्यायाम प्रकार सांगितले.
....
सावनेर शहरात ठिकठिकाणी याेग दिन
सावनेर : शहरात ठिकठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय येथे काेराेना पार्श्वभूमीवर योग दिन साजरा केला गेला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे हाेते. यावेळी पाेलीस निरीक्षक मारुती मुळूक, रामराव मोवाडे, न. प. उपाध्यक्ष अरविंद लोधी, तेजसिंह सावजी, अरुण रुषिया, दीपक कटारे, योगेश पाटील उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. भरत थापा यांनी आयुष मंत्रालयाच्या सामान्य योग प्रोटोकॉलनुसार मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन वेदश्री देशपांडे यांनी केले. शीतल कापसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला गुलाबराव टेकाडे, मनोहर दिवटे, शीतल कापसे, राहुल सावजी, मानवती थापा, चैतन्य ठाकरे, कैलाश शर्मा, सुरेश चरपे, देवेंद्र ठोंबरे, होमेश चोपडे, धनंजय वासाडे, योगेश लाखानी, विकास देशपांडे, सुनीता टेकाडे, विविधा उमाठे, कल्पना भेलोंडे, श्याम पांडे, हेमलता पांडे, निधी लाखानी, सुरेश अंतुरकर, कमल पैगवार, मदन शेंडे, मृणाल भगत, जयसिंह राठौर, सुजीत आडे, प्रणय जोगी आदी उपस्थित हाेते. पतंजली योग समिती तालुका सावनेर व भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने याेग दिन साजरा केला. तसेच सुभाष शाळेच्या प्रांगणात योग दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी किशोर धुंडले, रामराव माेवाडे, नगरसेवक तुषार उमाटे उपस्थित होते. लता ढवळे, आशा धुंडले, पद्मा बनकर, साहिल ढवळे, सचिन लीडर, शुभम ढवळे आदींनी याेगासने केली.
...
एकलव्य विद्यानिकेतन सावरगाव
सावरगाव : येथील एकलव्य विद्यानिकेतन येथे योग दिनाचे औचित्य साधून योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी याेग प्रशिक्षक प्रमोद नागापुरे, जयंत दाढे, उपप्राचार्य राजकमल ढोके, साहिल शेख व शिक्षक उपस्थित होते. या ऑनलाइन योग शिबिरात पहिली ते दहावीचे विद्यार्थी तसेच पालकांनी सहभाग घेतला हाेता. प्रमोद नागपुरे यांनी योगासन व प्राणायामचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे संचालन राजकमल ढोके यांनी केले.
===Photopath===
210621\img_20210621_112131.jpg
===Caption===
योगा करा आजार पडवा