सेवेचा महासागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:12 AM2017-10-02T01:12:57+5:302017-10-02T01:13:23+5:30
प. पू. डॉ. बाबासाहेबांच्या श्रद्धेपोटी देशभरातून धम्मचक्र प्रवर्तन दिनाला येणाºया अनुयायांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून विविध संस्था, संघटना पुढाकार घेऊन सेवाकार्य करतात.
नागपूर : प. पू. डॉ. बाबासाहेबांच्या श्रद्धेपोटी देशभरातून धम्मचक्र प्रवर्तन दिनाला येणाºया अनुयायांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून विविध संस्था, संघटना पुढाकार घेऊन सेवाकार्य करतात. येणाºया अनुयायांची सेवा हीच खरी बाबासाहेबांची सेवा या भावनेतून हे कार्य केले जाते. दीक्षाभूमीवर तळागळातून येणारा कुणीही उपाशी राहणार नाही, याची दक्षता हे सेवेकरी घेत असतात. सेवा देणाºया या संस्था संघटना नागपुरातूनच नाही, तर राज्यभरातून दीक्षाभूमीवर येत असतात. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दोन दिवसांपूर्वी येऊन सलग तीन दिवस भोेजनदानाचे महान कार्य करीत असतात. यंदाही अनेक संघटना या सेवाकार्यात पुढे आल्या.
बुटीबोरी औद्योगिक कर्मचारी वृंद
बुटीबोरीतील विविध उद्योगात काम करणाºया कर्मचाºयांनी दीभाभूमीवर येणाºया भाविकांना बुंदीचे वितरण केले. तसेच बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल मार्गदर्शन केले. यात अनिल गायकवाड, राजेश गजभिये, नरेंद्र पाटील, रोशन जांभुळकर, दिलीप दुर्गे, हेमंत बोरकर, ऋषी शेळके, स्वप्नील लोखंडे, रवि पिल्लेवान, श्याम मेश्राम, अरविंद नारायणे, उमेश दखने, रेवाशंकर गव्हारे, राजकुमार रामटेके, अमित डोरलीकर, राजेंद्र गेडाम आदींचे सहकार्य लाभले.
राष्टÑीय भावना सोशल आॅर्गनायझेशन
संघटनेतर्फे दीक्षाभूमीवर भोजनदान, संविधान पुस्तिकांचे वाटप तसेच मार्गदर्शनाचे कार्य केले जात आहे. संघटनेतर्फे गेल्या २७ वर्षांपासून अविरत सेवा सुरू असून यावेळी हा नित्यक्रम सुरू होता. संघटनेच्यावतीने अध्यक्ष मिलिंद डोंगरे, अनिल मून, सिद्धार्थ पाटील, दिलीप चिंचखेडे, रवी शहा, सुनीता डोंगरे, वर्षा चिंचखेडे, वंदना मून, लता कांबळे, सरोज डोंगरे, आनंद रिठे, भाउराव कोकणे, महेंद्र आगलावे आदींचा सहभाग आहे.
विदर्भ राज्य आघाडी
वेगळ््या विदर्भाच्या मागणीसाठी जनजागृती करणाºया विदर्भ राज्य आघाडीने आजपर्यंत विदर्भ वेगळा व्हावा यासाठी अनेक आंदोलने केली. रक्ताक्षरी आंदोलन राबविले. दीक्षाभूमीवर येणाºया बौद्ध अनुयायांनाही विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने खिचडी आणि पाणी वितरण करण्यात आले. आघाडीचे अॅड स्वप्नजीत सन्याल, श्रीकांत तराळ, सनी तेलंग, अनिल जवादे, नीरज खांदेवाले, अॅड सुरेंद्र पारधी, कमलेश भगतकर, फहीम अंसारी, समीन सोनवणे, अभिषेक रामटेके यांनी परिश्रम घेतले.
व्यसनमुक्तीचा जागर
दीक्षाभूमीवर येणाºया अनुयायांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी अल्कोहोलिक अनॉनिमस या संस्थेतर्फे व्यसनमुक्तीचा जागर करण्यात आला. शेषराज सी. अमरदीप डी., रवीकिरण एस. प्रवीण ए. यांनी दीक्षाभूमी परिसरात तीन हजारांवर पत्रके वाटून दारूपासून मुक्तीसाठी मार्गदर्शन केले.
युनियन बँक एससी, एसटी वेलफेअर असोसिएशन
असोसिएशनच्या वतीने दीक्षाभूमीवर येणाºया भाविकांना बिस्कीट आणि पाणी वितरण करण्यात आले. संघटनेतर्फे १९९२ पासून सलग २२ वर्ष दीक्षाभूमीवर सेवा देण्यात येत आहे. यावेळी संघटनेचे राजेश मेश्राम, मिलिंद वासनिक, पवन ढेंगरे, ज्ञानेश्वर बोदेले, कुमार मानके, जी. एम. वानखेडे, नीलिमा रामटेके, अखिल मेश्राम उपस्थित होते.