१ ऑक्टोबरपासून विदर्भात वनपर्यटन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 10:58 AM2019-09-21T10:58:42+5:302019-09-21T10:59:03+5:30
पेंच व्याघ्र संवर्धन प्रक ल्पाअंतर्गत सर्व गेट तसेच बोर व्याघ्र, संवर्धन प्रकल्पातील उमरेड, आणि पवनी, करांडला अभयारण्य व टिपेश्वर अभयारण्य या ठिकाणी १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत ऑफलाईन बुकिंग ठेवण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्यात बंद असलेले संरक्षित व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्याातील वनपर्यटन पुन्हा १ ऑक्टोबरपासून सुरू आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे डेप्युटी डायरेक्टर अमलेंदू पाठक यांनी या पर्यटनासंदर्भातील माहिती प्रकल्पाच्या वेबसाईटवर शुक्रवारी सायंकाळी जाहीर केली. पेंच व्याघ्र संवर्धन प्रक ल्पाअंतर्गत सर्व गेट तसेच बोर व्याघ्र, संवर्धन प्रकल्पातील उमरेड, आणि पवनी, करांडला अभयारण्य व टिपेश्वर अभयारण्य या ठिकाणी १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत ऑफलाईन बुकिंग ठेवण्यात आले आहे. तर १६ ते ३० ऑक्टोबर या काळात ५० टक्के ऑनलाईन बुकिंग सुरु राहणार आहे. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून पूर्ण क्षमतेचे ऑनलाईन बुकिंग उपलब्ध राहणार आहेत.