नितीन राऊत यांच्या उमेदवारी विरोधात पदाधिकारी एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 10:26 PM2019-07-30T22:26:20+5:302019-07-30T22:27:54+5:30
उत्तर नागपुरातील काँग्रेसचे नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांची त्यांच्या निवासस्थांनी भेट घेऊन उत्तर नागपुरातून नितीन राऊत यांच्या उमेदवारीला विरोध केला. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते की, महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवाराला मैदानात उतरवून खुलेआम त्याचा प्रचार केला व आर्थिक सहकार्यही केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर नागपुरातील काँग्रेसचे नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांची त्यांच्या निवासस्थांनी भेट घेऊन उत्तर नागपुरातून नितीन राऊत यांच्या उमेदवारीला विरोध केला. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते की, महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवाराला मैदानात उतरवून खुलेआम त्याचा प्रचार केला व आर्थिक सहकार्यही केले.
नितीन राऊत यांनी काँग्रेस विरोधी भूमिका निभावली आहे. लोकसभेतही नितीन राऊत यांचा सहभाग नाहीच्या बरोबरच होता. विशेष म्हणजे ते उत्तर नागपुरात प्रचारापासून दूरच राहिले. कुठल्याही निवडणुक सभेत त्यांनी सहभाग घेतला नाही. यावेळी पदाधिकाऱ्यांनी राऊत यांना काँग्रेस विरोधी संबोधून, त्यांना पक्षाने महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. त्यांची भूमिका पार्टी विरोधी राहिली असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी असे निवेदन सुद्धा कार्यकर्त्यांनी मुकुल वासनिक यांना दिले.
पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की, उत्तर नागपुरात नवीन उमेदवार द्यावा. ज्यांनी प्रदेश काँग्रेसकडे अर्ज करून मुलाखत दिली आहे, त्यातूनच एक उमेदवार देण्यात यावा. उत्तर नागपुरातून राऊत यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पदाधिकारी व समाजाच्या विरोधाचा सामना करावा लागेल. यावेळी नगरसेवक मनोज सांगोळे, संदीप सहारे, त्रिशरण सहारे, धरम पाटील, भावना लोणारे, स्नेहा निकोसे, सुनिता ढोले, बॉबी दहीवले, पंकज लोणारे, विवेक निकोसे, रोहित यादव, संतोष लोणारे, पीयूष लाडे, राज खत्री, पवन सोमकुंवर, इर्शाद शेख, इर्शाद मलिक, सुरूर सिद्दीकी, सूरज आवळे, अनमोल लोणारे, बादल वाहने, दीपक जैन, बशीर शेख, वामन इंदूरकर, शेख रहीम आदी उपस्थित होते.